Flipkart Big Billion Days Sale ची तारीख जाहीर, फोन-TV-लॅपटॉपवर 80% पर्यंत सूट

Updated on 14-Sep-2022
HIGHLIGHTS

Flipkart Big Billion Days Sale 23 सप्टेंबरपासून सुरु होणार

हा सेल 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे

सेलदरम्यान इलेक्ट्रॉनिक वस्तू 80% पर्यंत सवलतीसह उपलब्ध असतील.

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या सणासुदीच्या Big Billion Days Saleची तारीख जाहीर केली आहे. ही सेल  सात दिवस चालणार आहे. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 30 सप्टेंबर रोजी संपेल. या सेलमध्ये Flipkart स्मार्टवॉच, लॅपटॉप, वेअरेबल आणि इतर ऍक्सेसरीजवर 80% पर्यंत सूट देणार आहे.

हे सुद्धा वाचा : 200MP कॅमेरासह Motorola Edge 30 Ultra भारतात लाँच, 8 हजार रुपयांच्या सवलतीसह फोन खरेदी करा

Flipkart Plus वापरकर्त्यांसाठी, हा सेल एक दिवस आधी लाईव्ह होणार आहे. चला तर मग फ्लिपकार्टच्या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर आणि डील्सबद्दल सर्वकाही जाणून घेऊयात… 

फ्लिपकार्ट सेलमध्ये 'या' गोष्टींवर जबरदस्त सूट

 सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि ऍक्सेसरीजवर 80% पर्यंत सूट मिळणार आहे. हेडफोन्स, स्मार्टफोन्स, वायरलेस इअरफोन्स आणि इतर गोष्टींवर सवलत असेल. टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू 80% पर्यंत सवलतीसह उपलब्ध असतील. बिग बिलियन डेज 2022 मध्ये फ्लिपकार्ट एअर कंडिशनरवर तब्बल 50% पर्यंत सूट देईल.

एवढेच नाही तर, सेलमध्ये स्मार्टफोन्सवर डिस्काउंट आणि डील्सही दिल्या जातील. सेल दरम्यान, Apple, Samsung, Realme, Vivo, Poco आणि इतर ब्रँडच्या फोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. सेल दरम्यान नवीन स्मार्टफोन्स लाँच होण्याची शक्यता आहे. Flipkart बिग बिलियन डेज 2022 गेमिंग लॅपटॉपवर 40% पर्यंत सूट देईल. त्याचप्रमाणे, प्रिंटर आणि मॉनिटर्स 80% पर्यंत सूटसह सेलमध्ये उपलब्ध असतील.

तसेच, टॅब्लेट, लॅपटॉप आणि ऑडिओ ऍक्सेसरीजवरील ऑफर्स व्यतिरिक्त, बिग बिलियन डेज सेलमध्ये घरगुती आणि स्वयंपाकघरातील उपकरणे, लाइफस्टाइल प्रोडक्ट्स, फॅशन, सौंदर्य, फूड, खेळणी, फर्निचरच्या वस्तू इत्यादींवर सूट मिळेल.

'या' बँकांच्या कार्डवर सवलत असेल

 फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना सवलत देण्यासाठी ICICI बँक आणि Axis बँक यांच्याशी भागीदारी केली आहे. खरेदीदारांना विक्रीदरम्यान केलेल्या खरेदीवर 10% ची त्वरित सूट मिळणार आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :