Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलची तारीख जाहीर, स्मार्टफोनवर मिळेल तब्बल 40% पर्यंत सूट

Updated on 01-Aug-2022
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 6 ऑगस्टपासून सुरू होणार

हा फेस्टिव्हल सेल 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत चालेल

SBI कार्ड धारक या सेलमध्ये 10% सूट घेऊ शकतात

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलची तारीख भारतात ऑगस्टमध्ये ठेवण्यात आली आहे. ही ई-कॉमर्स वेबसाइट स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स सारख्या वस्तूंची सेल सुरू करेल, तर कंपनी अनेक उत्तम डिल्स देखील ऑफर करणार आहे. Amazon च्या नव्या सेलची तारीख आधीच जाहीर झाली आहे. Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 6 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

हे सुद्धा वाचा : Blaupunkt Anniversary Sale: स्मार्ट TVवर फ्लॅट 40% डिस्काउंट, फक्त 15,999 मध्ये खरेदी करा 40 इंच स्मार्ट टीव्ही

एवढेच नाही तर, या Amazon Freedom Sale दरम्यान, ग्राहक अनेक प्रोडक्ट्ससह अजून बरेच काही खरेदी करू शकतात आणि ऑफरचा लाभ घेऊ शकतात. जसे की, नवीन Tecno Smartphones, LG OLED TVs आणि Refrigerators वर मोठ्या सवलतीसह ऑफरचा लाभ घेऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, सेलपूर्वी कंपनीने काही ऑफर्सची पुष्टीही केली आहे. 

AMAZON ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलची तारीख

 Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 6 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 10 ऑगस्टपर्यंत चालेल. या सेल दरम्यान, ग्राहक मोठ्या प्रमाणात सूट आणि बंपर ऑफरसह विविध वस्तू खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर SBI कार्डधारक या सेलमधून 10% पर्यंत सूट घेऊ शकतात.

ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमधील ऑफर

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये डिस्काउंटसह बंपर ऑफर्सही दिल्या जात आहेत. या सेल ऑफरमध्ये स्मार्टफोन आणि ऍक्सेसरीजवर 40% पर्यंत सूट देखील दिली जाईल. सेलमध्ये 6,599 रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करता येईल. त्याच वेळी, मोबाईल ऍक्सेसरीजची किंमत 69 रुपयांपासून सुरू होईल.

याव्यतिरिक्त,  SBI क्रेडिट कार्ड ऑफरसह, ग्राहकांना मोबाईल फोन खरेदीवर नो-कॉस्ट EMI ऑफर देखील मिळेल. तुम्ही येथे लॅपटॉप देखील खरेदी करू शकता आणि लॅपटॉप खरेदी करणार्‍यांना 40,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. ग्राहकांना हेडफोनवर 75% पर्यंत सूट देखील मिळू शकते. Amazon ने असेही म्हटले आहे की, ग्राहकांना टॅबलेट आणि स्मार्टवॉचवर 45% आणि 70% पर्यंत सूट मिळेल.

तसेच, Amazon ग्राहकांना TV आणि इतर उपकरणांवर 60% पर्यंत सूट देऊ शकते. दुसरीकडे, जर तुम्हाला फ्रीज घ्यायचा असेल तर तो 7,240 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :