Blaupunkt Anniversary Sale: स्मार्ट TVवर फ्लॅट 40% डिस्काउंट, फक्त 15,999 मध्ये खरेदी करा 40 इंच स्मार्ट टीव्ही

Blaupunkt Anniversary Sale: स्मार्ट TVवर फ्लॅट 40% डिस्काउंट, फक्त 15,999 मध्ये खरेदी करा 40 इंच स्मार्ट टीव्ही
HIGHLIGHTS

Blaupunkt Anniversary Sale आजपासून सुरु

ही सेल 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्टपर्यंत चालेल

सेलमध्ये Blaupunkt चे सर्व स्मार्ट TV सवलतीसह उपलब्ध

तुम्हीही स्मार्ट TV  घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. जर्मन ब्रँड Blaupunkt ने त्यांच्या अनिव्हर्सरी सेलची घोषणा केली आहे. ज्यामध्ये तुम्ही Blaupunkt स्मार्ट TV वर कोणत्याही अटीशिवाय 40 % सूट मिळवू शकता. ऍनिव्हर्सरी सेलमध्ये सर्व Blaupunkt स्मार्ट टीव्ही मॉडेल्सवर सूट मिळतेय. Blaupunkt ची ऍनिव्हर्सरी सेल 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे आणि 3 ऑगस्टपर्यंत चालेल. या सेलमध्ये तुम्ही 40% च्या सूटसह 32 इंच ते 65 इंचापर्यंतचे टीव्ही खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया सर्व मॉडेल्सची किंमत…

हे सुद्धा वाचा : Realme Pad X ची पहिली विक्री आज, बघा किंमत, जबरदस्त स्पेक्स आणि ऑफर्स

Blaupunkt सायबर साउंड सिरीज 

Blaupunkt ने सायबर साउंड टीव्ही मॉडेलसह भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. या सीरिजच्या 32-इंच लांबीच्या मॉडेलची किंमत 13,499 रुपये आहे. परंतु तुम्ही हा TV सेलमध्ये 11,999 रुपयांना खरेदी करू शकता. या टीव्हीमध्ये HD रेडी स्क्रीन आहे. याशिवाय यात 40W चा स्पीकर देण्यात आला आहे, म्हणजे 20w चे दोन स्पीकर आहेत.

blaupunkt tv

या सीरिजचे 40-इंच मॉडेल 16,999 ऐवजी 15,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. यात फुल HD स्क्रीन आहे. 42-इंच फुल HD मॉडेल 2,000 रुपयांच्या सवलतीसह 17,999 रुपयांना उपलब्ध आहे. या टीव्हीमध्ये 1 GB RAM सह 8 GB स्टोरेज आणि 40W स्पीकर आहे. 43-इंच फुल HD मॉडेल 3,000 रुपयांच्या सवलतीसह 19,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Blaupunkt चा 65-इंच लांबीचा अल्ट्रा HD म्हणजेच 4K टीव्ही 54,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. यात डॉल्बी डिजिटल प्लस आणि DTS TruSurround च्या समर्थनासह Android 10 सह 60W स्पीकर मिळतो. या टीव्हीसोबत 4 स्पीकर उपलब्ध असतील. त्याची स्क्रीन ब्राइटनेस 500 nits आहे. कंपनीचा 50-इंच लांबीचा 4K टीव्ही देखील 2,000 रुपयांच्या सवलतीसह 31,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. यात Android 10 सह 60W स्पीकर आहे.
 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo