सरकारने Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टल सुरू केले आहे.
आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे ऍप सरकारने लाँच केले आहे.
जाणून घ्या Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टलचे फायदे
Aadhaar कार्ड धारकांसाठी सरकारने Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टल सुरू केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे ऍप सरकारने लाँच केले आहे. लक्षात घ्या की, आधार ऑथेंटिकेशन प्रक्रिया आधार गुड गव्हर्नन्स पोर्टलवरून स्वयंचलित केली जाईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) आधार सुशासन पोर्टल सुरू केले आहे. आधार गुड गवर्नेंस पोर्टलच्या मदतीने आधार अधिक सोयीस्कर बनवले जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे.
आधार ऑथेंटिकेशन सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांसाठी हे आधार गुड गव्हर्नन्स पोर्टल उपयुक्त ठरेल, असे सांगण्यात आले आहे. त्या बरोबरच, सरकारने अर्ज प्रक्रियांमध्ये फेस ऑथेंटिकेशन सुरू करण्याचेही सुचवले आहे. यामध्ये आधार सुरक्षा वाढवण्यासाठी OTP आधारित प्रमाणीकरण प्रक्रिया कमी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तसेच, सगळीकडे बायोमेट्रिक-आधारित प्रमाणीकरण लागू करण्याची सूचना करण्यात आली आहे.
Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टलचे फायदे
Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टल अनेक सार्वजनिक हिताच्या सेवांसाठी आधार ऑथेंटिकेशनला सपोर्ट करते. हे प्लॅटफॉर्म सरकारी आणि खाजगी संस्थांना ओळख पटविण्यासाठी आधारची ऍक्सेसिबिलीटी देखील सहज आणि सोपी करते.
या पोर्टलद्वारे आरोग्य कर्मचारी रुग्णांना अधिक सहजपणे ओळखू शकतात.
यामुळे शैक्षणिक आणि त्यासंबंधित प्रक्रिया सोपी आणि अचूक होईल.
ऑनलाइन व्यवहारांच्या बाबतीत आधार प्रमाणीकरण eKYC ची प्रक्रिया सोपी होईल. यामुळे ऑनलाइन फसवणूक टाळण्यास मदत होईल.
त्याबरोबरच, बँक आणि वित्तीय संस्था आधार प्रमाणीकरण वापरू शकतात. एवढेच नाही तर, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि मानव संसाधन माहिती प्रमाणित करण्यासाठी आधारचा वापर केला जातो.
आधार गुड गवर्नेंस पोर्टल ऑथेंटिकेशन प्रक्रिया
सर्वप्रथम swik.meity.gov.in पोर्टलवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
यासाठी मंत्रालय आणि नावासह अनेक प्रकारची माहिती प्रविष्ट करा.
त्यानंतर आधार ऑथेंटिकेशनसाठी तुम्हाला रजिस्टर आणि अप्लाय करा या पर्यायावर टॅप करा.
त्यानंतर आधार ऑलेन्टिकेशन का आवश्यक आहे? ते सत्यापित करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती तुम्हाला दिसेल.
हे पोर्टल रेग्युलेटरी गाईडलाईन्सनुसार ऍपचे व्यवस्थापन करते. हे फक्त मान्यताप्राप्त संस्थांनाच प्रवेश मिळण्याची खात्री करते.
मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या सिस्टम ऍप्स आणि सेवांमध्ये आधार प्रमाणीकरण लागू करू शकता.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टल अनेक क्षेत्रांमध्ये प्रमाणीकरण सक्षम करते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.