Digit.in
  • न्यूज
  • फिचर्स
  • How to
  • व्हिज्युअल स्टोरी
  • English
  • Hindi
  • Tamil
  • Kannada
  • Telugu
  • Malayalam
  • Bangla
  • Marathi
Login / Register is disabled Login
Home » News » General » नेहमी-नेहमी अर्ज प्रक्रियेचा वैताग आलाय? सरकारने लाँच केले Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टल, वाचा डिटेल्स 

नेहमी-नेहमी अर्ज प्रक्रियेचा वैताग आलाय? सरकारने लाँच केले Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टल, वाचा डिटेल्स 

By Reshma Zalke | Updated on 03-Mar-2025
Add DIGIT as a preferred source
Follow Us on Google News Follow Us
HIGHLIGHTS

सरकारने Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टल सुरू केले आहे.

आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे ऍप सरकारने लाँच केले आहे.

जाणून घ्या Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टलचे फायदे

नेहमी-नेहमी अर्ज प्रक्रियेचा वैताग आलाय? सरकारने लाँच केले Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टल, वाचा डिटेल्स 
Reshma Zalke Reshma Zalke
03-Mar-2025

Aadhaar कार्ड धारकांसाठी सरकारने Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टल सुरू केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे ऍप सरकारने लाँच केले आहे. लक्षात घ्या की, आधार ऑथेंटिकेशन प्रक्रिया आधार गुड गव्हर्नन्स पोर्टलवरून स्वयंचलित केली जाईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) आधार सुशासन पोर्टल सुरू केले आहे. आधार गुड गवर्नेंस पोर्टलच्या मदतीने आधार अधिक सोयीस्कर बनवले जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Ration Card eKYC: ‘अशा’प्रकारे घरबसल्या तुमच्या फोनवरच रेशनसाठी इ-केवायसी करा, पहा सोपी प्रोसेस

Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टल

आधार ऑथेंटिकेशन सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांसाठी हे आधार गुड गव्हर्नन्स पोर्टल उपयुक्त ठरेल, असे सांगण्यात आले आहे. त्या बरोबरच, सरकारने अर्ज प्रक्रियांमध्ये फेस ऑथेंटिकेशन सुरू करण्याचेही सुचवले आहे. यामध्ये आधार सुरक्षा वाढवण्यासाठी OTP आधारित प्रमाणीकरण प्रक्रिया कमी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तसेच, सगळीकडे बायोमेट्रिक-आधारित प्रमाणीकरण लागू करण्याची सूचना करण्यात आली आहे.

Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टलचे फायदे

  • Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टल अनेक सार्वजनिक हिताच्या सेवांसाठी आधार ऑथेंटिकेशनला सपोर्ट करते. हे प्लॅटफॉर्म सरकारी आणि खाजगी संस्थांना ओळख पटविण्यासाठी आधारची ऍक्सेसिबिलीटी देखील सहज आणि सोपी करते.
  • या पोर्टलद्वारे आरोग्य कर्मचारी रुग्णांना अधिक सहजपणे ओळखू शकतात.
  • यामुळे शैक्षणिक आणि त्यासंबंधित प्रक्रिया सोपी आणि अचूक होईल.
  • ऑनलाइन व्यवहारांच्या बाबतीत आधार प्रमाणीकरण eKYC ची प्रक्रिया सोपी होईल. यामुळे ऑनलाइन फसवणूक टाळण्यास मदत होईल.
  • त्याबरोबरच, बँक आणि वित्तीय संस्था आधार प्रमाणीकरण वापरू शकतात. एवढेच नाही तर, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि मानव संसाधन माहिती प्रमाणित करण्यासाठी आधारचा वापर केला जातो.

आधार गुड गवर्नेंस पोर्टल ऑथेंटिकेशन प्रक्रिया

  • सर्वप्रथम swik.meity.gov.in पोर्टलवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
  • यासाठी मंत्रालय आणि नावासह अनेक प्रकारची माहिती प्रविष्ट करा.
  • त्यानंतर आधार ऑथेंटिकेशनसाठी तुम्हाला रजिस्टर आणि अप्लाय करा या पर्यायावर टॅप करा.
  • त्यानंतर आधार ऑलेन्टिकेशन का आवश्यक आहे? ते सत्यापित करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती तुम्हाला दिसेल.
  • हे पोर्टल रेग्युलेटरी गाईडलाईन्सनुसार ऍपचे व्यवस्थापन करते. हे फक्त मान्यताप्राप्त संस्थांनाच प्रवेश मिळण्याची खात्री करते.
  • मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या सिस्टम ऍप्स आणि सेवांमध्ये आधार प्रमाणीकरण लागू करू शकता.

महत्त्वाचे लक्षात घ्या की, Aadhaar गुड गवर्नेंस पोर्टल अनेक क्षेत्रांमध्ये प्रमाणीकरण सक्षम करते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

No posts for this criteria.
Mobile Recharge Plans
  • Airtel Recharge Plans
  • BSNL Recharge Plans
  • Reliance JIO Recharge Plans
  • VI Recharge Plans
  • icon
  • icon
  • icon
  • icon
SUBSCRIBE Subscribe for the industry's biggest tech news
Enter your email to get notified about our new solutions
By submitting your email, you agree to our
Terms and Privacy Notice.
CONNECT WITH US
  • icon Times Center, FC-6, 1st Floor, Sector 16A, Film City, Noida - 201301
  • icon (+91-120-6776999)
    (1800 121 0005)
  • icon Suggestion: editor@digit.in
    Business: business@digit.in
    Website: sales@digit.in
© 2026 Digit.in, All rights reserved
  • icon
  • icon
  • icon
  • icon
icon
  • About Us
  • Contact Us
  • Advertise with us
  • Regulatory
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
  • Disclaimer
© 2026 Digit.in, All rights reserved
Digit.in
Logo
Digit.in
Logo