JioCinema New Plans
नेहमीच्या धकाधकीच्या जीवनामुळे तुम्हाला कंटाळा येत आहे का? आता जरा विश्रांती घ्यावी वाटतेय ना. पण विश्रांती घेण्यासाठी तुमच्याकडे फार वेळ नाही. अशा परिस्थितीमध्ये काळजी अजिबात करू नका, कारण या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही खास घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला काही सर्वोत्कृष्ट कॉमेडी चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत, ज्या JioCinema वर अगदी मोफत पाहता येतील. यासह तुमचे मनोरंजन तर होईलच पण सकारात्मक सामग्री बघून तुमचे मूडदेखील अप्रतिम होईल.
‘चुप चुप के’ हा एक विनोदी-नाटक चित्रपट आहे. ज्यामध्ये एक तरुण आपल्या कर्जापासून वाचण्यासाठी मूकबधिर बनतो. अभिनेता शाहिद कपूर, राजपाल यादव आणि परेश रावल इ. कलाकारांची जबरदस्त कॉमेडी या चित्रपटात बघायला मिळणार आहे.
भाषा: हिंदी
शैली: विनोदी, नाटक
IMDb रेटिंग: 6.7/10
कलाकार: शाहिद कपूर, करीना कपूर खान, परेश रावल इ.
स्लॅपस्टिक कॉमेडी आणि हास्यास्पद गैरसमज असलेले लोकप्रिय गोलमाल चित्रपट सिरीजचा पहिला भाग अतिशय मनोरंजक आहे. या चित्रपटात चार मित्रांची हास्यास्पद कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपट अभिनेता अजय देवगण, तुषार कपूर, इ. कलाकारांची जबरदस्त कॉमेडी बघायला मिळेल.
भाषा: हिंदी
शैली: विनोदी
IMDb रेटिंग: 7.3/10
कलाकार: अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर
एक विनोदी-रहस्यमय चित्रपट ज्यामध्ये एक थिएटर समूह हास्यास्पद गैरसमज आणि चुकीच्या ओळखीच्या जाळ्यात अडकला आहे. या चित्रपटात अभिनेता परेश रावल, अक्षय कुमार आणि गोविंदा हे कॉमेडीचे दिग्गज मुख्य भूमिकीट आहेत. हे चित्रपट बघितल्यावर तुम्ही क्षणोक्षणी पॉट धरून हसाल.
भाषा: हिंदी
शैली: विनोद, रहस्य
IMDb रेटिंग: 6.4/10
कलाकार: अक्षय कुमार, गोविंदा, परेश रावल
धमाल चित्रपटात लपलेल्या खजिन्याच्या शोधात वेडसर प्रवास करणाऱ्या चार मित्रांबद्दलची गोंधळात टाकणारी कॉमेडी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी इ. प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
भाषा: हिंदी
शैली: विनोदी, साहसी
IMDb रेटिंग: 7.3/10
कलाकार: रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी