OTT Releases This Week: ‘या’ आठवड्यात OTT वर मिळेल रोमान्स, क्राईम आणि सस्पेन्ससह मनोरंजनाचा भारी डोज, बघा यादी

OTT Releases This Week: ‘या’ आठवड्यात OTT वर मिळेल रोमान्स, क्राईम आणि सस्पेन्ससह मनोरंजनाचा भारी डोज, बघा यादी
HIGHLIGHTS

स्कूल कॉलेज आणि लाइफ चित्रपटात मुख्य कलाकार म्हणून नागिन आणि बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश आहे

'फॅमिली आज कल' ही वेब सिरीज ३ एप्रिलपासून Sony LIV वर स्ट्रीम होत आहे.

रिप्ले या चित्रपटात, अँड्र्यू स्कॉट टॉम रिप्लेची भूमिका करत आहे.

भारतीय तरुणाईमध्ये OTT चे क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एकापेक्षा एक मनोरंजक सामग्री बघायला मिळते. नवनवीन आणि लोकप्रिय चित्रपट, देशी आणि विदेशी वेब सिरीज बघायला मिळतात. आपणा सर्वांना माहितीच आहे की, दर आठवड्याला OTT अनेक नवीन चित्रपट आणि वेब सिरीज अनेक भाषांमध्ये रिलीज होत असतात. त्यामुळे रसिक प्रेक्षकांसाठी हा रिपोर्ट अगदी महत्त्वाचा ठरेल. या आठवड्यात मराठीमध्ये अप्रतिम चित्रपट रिलीज होणार/झाले आहेत. तर, हिंदी शोजमध्ये तुम्हाला बायोग्राफी, गुन्हेगारी, थ्रिलर्सपर्यंत अशा विविध शैलीची सामग्री मिळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात संपूर्ण यादी-

School College Ani Life (2 April)

स्कूल कॉलेज आणि लाइफ हा 2023 चा विहान सूर्यवंशी दिग्दर्शित आणि रोहित शेट्टी, पवित्रा गांधी आणि विवेक शाह यांनी रिलायन्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने निर्मित केलेला भारतीय मराठी भाषेतील रोमँटिक चित्रपट आहे. याद्वारे रोहित शेट्टीचे निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले आहे. चित्रपटात मुख्य कलाकार म्हणून नागिन आणि बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश, करण परब, जितेंद्र जोशी इ. आहेत. हा चित्रपट Zee5 वर 2 एप्रिल रोजी रिलीज झाला आहे.

Imdb Rating: 8.9

Language and Genre: Marathi, Drama, Romantic

Cast: Tejashwi Prakash, Karan Parab, Jitendra Joshi

OTT Release Date: 2 April 2024

Where to Watch: Zee5

Single (2 April)

सिंगल या मराठी चित्रपटात दोन मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. राहुलच्या भूमिकेत प्रथमेश परब अभिनय बेर्डे हे दोन्ही प्रसिद्ध अभिनेते मुख्य भूमिकेत आहेत. तर, अमृताची भूमिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आहे. हा चित्रपट Zee5 वर 2 एप्रिल रोजी रिलीज झाला असून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.

Imdb Rating: 9.0

Language and Genre: Marathi, Drama, Romantic

Cast: Prathamesh Parab, Abhinay Berde, Prajakta Gaikwad

OTT Release Date: 2 April 2024

Where to Watch: Zee5

Family aaj kal (3 April)

प्रखर, अपूर्व अरोरा, नितेश पांडे, सोनाली सचदेव यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘फॅमिली आज कल’ ही वेबसिरीज 3 एप्रिलपासून Sony LIV वर स्ट्रीम होत आहे. ही वेब सिरीज तुम्ही कुटुंबासोबत बसून पाहू शकता. कश्यपची मुलगी एका कॅब ड्रायव्हरच्या प्रेमात पडते तेव्हा काय होते ते दाखवले आहे. प्रेक्षकांसाठी ही सिरीज अगदी मनोरंजक ठरणार आहे.

Language and Genre: Hindi, Drama, Family

Cast: Prakhar, Apoorva Arora, Nitesh Pandey, Sonali Sachdev

OTT Release Date: 3 April 2024

Where to Watch: Sony LIV

Yeh meri family (4 April)

(ये मेरी फॅमेली) ही देखील एक कौटुंबिक वेब सिरीज आहे, ज्याचा सीझन 3 आज म्हणजेच 4 एप्रिल 2024 रोजी Amazon Mini TV वर येत आहे. यात हेतल गडा, अंगद राज, राजेश कुमार, जुही परमार, वीणा मेहता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभ्यासाबाबत सतत सुरू असलेला संघर्ष कधी संपणार हे या सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे.

Language and Genre: Hindi, Drama, Family

Cast: Hetal Gada, Angad Raj, Rajesh Kumar, Juhi Parmar, Veena Mehta

OTT Release Date: 4 April 2024

Where to Watch: Amazon Mini TV

Farrey (5 April)

Farrey सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्रीचा हा डेब्यू चित्रपट आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याने 2.25 कोटींची कमाई केली होती. आता हा चित्रपट OTT वर येणार आहे. अलिझेह व्यतिरिक्त या चित्रपटात प्रसन्न बिश्त, रोनित रॉय, साहिल मेहता, जुही बब्बर, अरबाज खान आणि शिल्पा शुक्ला आहेत. हा चित्रपट 5 एप्रिल रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

Language and Genre: Hindi, Drama, Romantic

Cast: Arsh Wahi, Alizeh Agnihotri, Juhi Babbar

OTT Release Date: 5 April 2024

Where to Watch: Zee5

Ripley (4 April)

रिप्ले या चित्रपटात, अँड्र्यू स्कॉट टॉम रिप्लेची भूमिका करत आहे, जो 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला न्यूयॉर्कमधील एक ग्रिफ्टर होता. ज्याला एका श्रीमंत माणसाच्या मुलाला इटलीमधून घरी आणण्यासाठी नियुक्त केले होते. टॉमची नोकरी लवकरच फसवणूक आणि खुनाच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये अडकते. ज्या प्रेक्षकांना सस्पेन्स आणि क्राईम बघायला आवडते, त्यांच्यासाठी हा ड्रामा परफेक्ट आहे.

Language and Genre: English, Crime

Cast: Andrew Scott, Johnny Flynn, Dakota Fanning

OTT Release Date: 4 April 2024

Where to Watch: Netflix

Crooks

कौटुंबिक माणूस चार्ली शांततापूर्ण जीवनाची आकांक्षा बाळगतो. मात्र, जुन्या ओळखींमुळे त्याच्या कुटुंबाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. हे टाळण्यासाठी त्याला एक मौल्यवान नाणे मिळवण्यासाठी दरोडा घालावा लागतो. शोमध्ये Jonathan Tittel, Nicolas Wanczycki, Svenja Jung हे प्रमुख कलाकार आहेत. हा शो 4 एप्रिल रोजी Netflix वर स्ट्रीम होणार आहे.

Language and Genre: English, Crime

Cast: Jonathan Tittel, Nicolas Wanczycki, Svenja Jung

OTT Release Date: 4 April 2024

Where to Watch: Netflix

Parasyte: The Grey (5 April)

‘पॅरासाइट: द ग्रे’ Netflix वर 5 एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या मीममध्ये परजीवींची कहाणी दाखवली आहे आणि ते माणसांना कसे ताब्यात घेतात, ते दाखवले आहे. या शोमध्ये Koo Kyo-hwan, Jeon So-nee, Jung Hyun Lee हे प्रमुख कलाकार आहेत.

Language and Genre: English, Crime

Cast: Koo Kyo-hwan, Jeon So-nee, Jung Hyun Lee

OTT Release Date: 5 April 2024

Where to Watch: Netflix

SCOOP (2024)

स्कूप शो प्रिन्स अँड्र्यू यांनी BBC ला 2019 मध्ये सांगितलेल्या संभाषणावर आधारित आहे. हा चित्रपट पीटर मॉफॅट यांनी लिहिलेल्या न्यूजनाइटचे माजी संपादक सॅम मॅकअलिस्टर यांच्या ‘स्कूप्स: बिहाइंड द सीन्स ऑफ द BBC’ च्या मोस्ट शॉकिंग इंटरव्ह्यूज या पुस्तकाचे रूपांतर आहे. हा शो 5 एप्रिल पासून Netflixवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Language and Genre: English, Crime, Drama

Cast: Koo Kyo-hwan, Jeon So-nee, Jung Hyun Lee

OTT Release Date: 5 April 2024

Where to Watch: Netflix

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo