Blaupunkt BTW100 TWS इयरबड्स भारतात लाँच, फास्ट चार्जिंगसह मिळतील जबरदस्त फीचर्स

Updated on 22-Jun-2022
HIGHLIGHTS

Blaupunkt BTW100 TWS इयरबड्स भारतात लाँच

नवीनतम इयरबड्सची किंमत 2,999 रुपये

तब्बल 40 तासांचा बॅटरी बॅकअप असल्याचा दावा

बऱ्याच टेक कंपन्या स्टायलिश वेअरेबल्स लाँच करत आहेत. तरुणाईमध्ये या गॅजेट्सबाबत क्रेझ तर आहेच. पण स्वतःचे लूक्स स्टाईल करण्यासाठी देखील स्टायलिश गॅजेट्सचा वापर होताना दिसतोय. यामुळे युजर्सचे काम तर होतेच, त्यासोबतच त्यांचे लूक देखील स्टाईल होते. या यादीमध्ये आता आणखी एक गॅजेट सामील झाले आहे. जर्मन ब्रँड Blaupunkt ने आता भारतीय बाजारात स्मार्ट टीव्ही नंतर Blaupunkt BTW100 TWS इयरबड्स लाँच केले आहेत. Blaupunkt BTW100 TWS "ENC CRISPR" टेक्नॉलॉजीसह येतील, ज्यात उत्तम नॉइज कॅन्सलेशन असले, असा दावा केला जातो. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने कॉल दरम्यान इयरबड्स फक्त मानवी आवाज पकडतील, असा देखील दावा केला गेला आहे.

हे सुद्धा वाचा : 14 दिवसांच्या बॅटरी लाईफसह Mi Smart Band 7 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Blaupunkt BTW100 TWS

Blaupunkt BTW100 TWS ओवल आकाराच्या चार्जिंग केससह मिळतील. याच्या बॅटरीबाबत 40  तासांचा बॅकअप असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात 10mm ड्रायव्हर आहे, जो क्रिस्टल क्लिअर आणि पंची ऑडिओ असल्याचा दावा करतो. इअरबड्सबाबत HD स्टिरिओ साउंडचा दावा देखील करण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.1 देण्यात आला आहे, ज्याची कनेक्टिव्हिटी रेंज 30 फूट आहे. यासह, 80ms चा लो लेटन्सी मोड देखील उपलब्ध असेल, जो गेमर्ससाठी सर्वोत्तम असल्याचे सिद्ध होईल. Blaupunkt BTW100 TWS च्या चार्जिंग केसमध्ये TurboVolt फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 400mAh ची बॅटरी आहे.

15 मिनिटांच्या चार्जिंगवर एका तासाचा बॅकअप मिळेल असा दावा केला जात आहे. इयरबड्सच्या बॅटरीबाबत एकूण 40 तासांचा बॅकअप असल्याचा दावा करण्यात आला आहे. चार्जिंगसाठी यात टाइप-C पोर्ट आहे. Blaupunkt BTW100 TWS ची किंमत 2,999 रुपये आहे. कंपनीच्या वेबसाइट आणि Amazon वरून ब्लॅक आणि व्हाइट या दोन रंगांमध्ये हे डिवाइस खरेदी करता येईल.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :