14 दिवसांच्या बॅटरी लाईफसह Mi Smart Band 7 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

14 दिवसांच्या बॅटरी लाईफसह Mi Smart Band 7 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
HIGHLIGHTS

Mi Smart Band 7 फिटनेस बँड लाँच

स्मार्ट बँडमध्ये ऑल्वेज ऑन डिस्प्ले देखील मिळेल

त्याबरोबरच, यामध्ये हेल्थ ट्रॅकर्स आणि स्पोर्ट्स मोडदेखील मिळतील

Mi ने Mi Smart Band 7 लेटेस्ट फिटबँड म्हणून लाँच केले आहे. Mi Smart Band 7 हे डिवाइस अलीकडेच इन्फोकॉम मीडिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (IMDA) आणि NCC सारख्या विविध सर्टिफिकेशन साइटवर दिसले. कंपनीने ते मे महिन्यात चीनमध्ये लाँच केले होते. कंपनीने आता युरोपमध्ये बँडची नॉन-एनएफसी आवृत्ती लाँच केली आहे. स्मार्ट बँडमध्ये 1.62-इंच लांबीचा AMOLED ऑल्वेज ऑन डिस्प्ले आहे. कंपनीचा दावा आहे की, हे डिवाइस एका चार्जवर तब्बल 14 दिवस टिकेल. कंपनीने नवीन बँड सहा रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला आहे. चला तर जाणून घेऊयात नवीन फिटनेस बँडबद्दल सर्व काही…

हे सुद्धा वाचा : अक्षय कुमारच्या आगामी 'रक्षा बंधन' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, चित्रपटात हुंड्याची कुप्रथा दाखवली जाणार

 Mi Smart Band 7 ची किंमत 

NFC शिवाय Mi Band 7 च्या स्टॅंडर्ड वर्जनची युरोपमध्ये किंमत 59.99 युरो म्हणजेच अंदाजे 4,700 रुपये आहे. बँड 7 युरो 49.99 म्हज्जेचं अंदाजे 4,100 रुपये सुरुवातीच्या किमतीत देखील उपलब्ध आहे. Redmi Buds 4 Pro सोबत, कंपनीने गेल्या महिन्यात चीनमध्ये Mi Smart Band 7 लाँच केला होता, जिथे स्टॅंडर्ड वर्जनसाठी त्याची किंमत CNY 249 म्हणजेच अंदाजे  2,900 रुपये असेल, तर NFC व्हेरिएंटची किंमत CNY 299 म्हणजेच सुमारे 3,500 रुपये आहे. हे डिवाइस ब्लॅक, ब्लू, ग्रीन, ऑरेंज, पिंक आणि व्हाइट कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. 

mi band 7

Mi Smart Band 7 

Mi स्मार्ट बँड 7 मध्ये 192×490 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.62-इंच AMOLED ऑल्वेज ऑन डिस्प्ले, 500 nits पीक ब्राइटनेस आणि 326ppi पिक्सेल डेन्सिटी आहे. हे डिवाइस हेल्थ ट्रॅकर्ससह येतो ज्यात हार्ट रेट सेन्सर, फिमेल हेल्थ ट्रॅकिंग आणि स्लीप मॉनिटरिंगसह SpO2 मॉनिटर देखील समाविष्ट आहे. हे डिवाइस स्किपिंग, जिम्नॅस्टिक्स, स्किपिंग आणि टेनिससह 120 स्पोर्ट्स मोडला सपोर्ट करते.

Mi Smart Band 7 वर कॉल आणि मेसेज नोटिफिकेशन्स ऍक्सेस करता येतात. हे डिवाइस NFC आणि ब्लूटूथ v5.2 कनेक्टिव्हिटीसह येते. वेअरेबल 5ATM (50 मीटर) पर्यंत पाणी प्रतिरोधक आहे. एका चार्जवर 14 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देण्याचा दावा केला आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo