Digit.in
  • न्यूज
  • फिचर्स
  • How to
  • व्हिज्युअल स्टोरी
  • English
  • Hindi
  • Tamil
  • Kannada
  • Telugu
  • Malayalam
  • Bangla
  • Marathi
Login / Register is disabled Login
Home » News » Apps » WhatsApp Security आता एक पाऊल पुढे! स्पॅम मेसेजपासून होईल सुटका, येणार नवे फिचर 

WhatsApp Security आता एक पाऊल पुढे! स्पॅम मेसेजपासून होईल सुटका, येणार नवे फिचर 

By Reshma Zalke | Updated on 20-Aug-2024
Add DIGIT as a preferred source
Follow Us on Google News Follow Us
HIGHLIGHTS

लवकरच WhatsApp वर 'Block Unknown Account Message' नावाचे फीचर येणार

या फीचरद्वारे WhatsApp यूजर्सची गोपनीयता आणि सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार

नावाप्रमाणेच हे फीचर WhatsApp वर तुमच्याकडे येणारे अनोळखी अकाउंट्सचे मेसेज ब्लॉक करेल.

WhatsApp Security आता एक पाऊल पुढे! स्पॅम मेसेजपासून होईल सुटका, येणार नवे फिचर 
Reshma Zalke Reshma Zalke
20-Aug-2024

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स सादर करत असते. एवढेच नाही तर, WhatsApp युजर्सच्या सुरक्षा आणि गोपनीयतेची देखील अधिक काळजी घेते. आम्ही तुम्हाला सांगतो की, लवकरच इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन सिक्योरिटी फिचर सादर करणार आहे. होय, ताज्या लीकनुसार, लवकरच व्हॉट्सॲपवर ‘Block Unknown Account Message’ नावाचे फीचर येणार आहे. चला तर मग, जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या फिचरबद्दल अधिक माहिती-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Limited Time Offer! Vodafone Idea ची अप्रतिम ऑफर, तब्बल 50GB एक्सट्रा डेटासह OTT सबस्क्रिप्शन्स मिळतोय Free

whatsapp-new feature

Block Unknown Account Message फिचर

‘Block Unknown Account Message’ या फीचरच्या नावाप्रमाणेच हे फीचर WhatsApp वर तुमच्याकडे येणारे अनोळखी अकाउंट्सचे मेसेज ब्लॉक करेल. Wabetainfo च्या ताज्या लीकमध्ये, Android 2.24.17.24 अपडेटसाठी WhatsApp बीटाद्वारे या नवीन फीचरची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, नवे फीचर लवकरच WhatsApp वर आणले जाईल. होय, हे फीचर अनोळखी अकाऊंटमधून येणारे मेसेज ब्लॉक करण्याचे कार्य करेल.

या फीचरद्वारे WhatsApp यूजर्सची गोपनीयता आणि सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे. याशिवाय व्हॉट्सॲपवर येणाऱ्या स्पॅम मेसेजपासूनही तुम्हाला सहज सुटका मिळेल. ही सेटिंग ऑन केल्यानंतर तुमच्या फोनमधील स्टोरेज लवकर भरण्याची समस्याही आता संपुष्टात येईल. एकंदरीत हे फिचर आल्यास तुमच्या फसवणुक होण्याचे शक्यता नाहीच्या बरोबर असतील.

कसे कार्य करेल नवे फीचर?

WhatsApp news of the week: automatic unknown account messages blocking feature is under development!

This weekly summary can help you catch up on our 6 stories about WhatsApp beta for Android, iOS, and Desktop!https://t.co/Pb5mml90qm pic.twitter.com/yAx60Ba1Pl

— WABetaInfo (@WABetaInfo) August 17, 2024

तुम्ही वरील पोस्टमधील स्क्रिनशॉटमध्ये बघू शकता की, व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना येत्या काळात Advanced सेटिंग्जमध्ये ‘Block Unknown Account Message’ नावाचा टॉगल मिळणार आहे. हे टॉगल ऑन केल्यानंतर, अनोळखी खात्यातून येणाऱ्या मॅसेजेस मर्यादा ओलांडल्यानंतर WhatsApp आपोआप ते अकाउंट ब्लॉक करेल. होय, तुम्हाला ते अकाउंट स्वतंत्रपणे ब्लॉक करण्याची गरज उरणार नाही. यासह तुम्ही तुमची सुरक्षा आणि गोपनीयता कायम राहील.

महत्त्वाचे लक्षात घ्या की, हे फिचर सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. WhatsApp लवकरच आपल्या वापरकर्त्यांसाठी हे फिचर आणेल, अशी अपेक्षा केली जाऊ शकते. मात्र, विकासाच्या टप्प्यात असल्याने येत्या काळात हे फिचर इतर अपग्रेडसह सादर केले जाईल, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

No posts for this criteria.
Mobile Recharge Plans
  • Airtel Recharge Plans
  • BSNL Recharge Plans
  • Reliance JIO Recharge Plans
  • VI Recharge Plans
  • icon
  • icon
  • icon
  • icon
SUBSCRIBE Subscribe for the industry's biggest tech news
Enter your email to get notified about our new solutions
By submitting your email, you agree to our
Terms and Privacy Notice.
CONNECT WITH US
  • icon Times Center, FC-6, 1st Floor, Sector 16A, Film City, Noida - 201301
  • icon (+91-120-6776999)
    (1800 121 0005)
  • icon Suggestion: editor@digit.in
    Business: business@digit.in
    Website: sales@digit.in
© 2026 Digit.in, All rights reserved
  • icon
  • icon
  • icon
  • icon
icon
  • About Us
  • Contact Us
  • Advertise with us
  • Regulatory
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
  • Disclaimer
© 2026 Digit.in, All rights reserved
Digit.in
Logo
Digit.in
Logo