Jio Cricket plan: क्रिकेट लव्हर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच, काय मिळेल खास ?

Jio Cricket plan: क्रिकेट लव्हर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच, काय मिळेल खास ?
HIGHLIGHTS

क्रिकेट लव्हर्ससाठी आनंदाची बातमी

खास IPLनिमित्त Jio Cricket plan

नव्या प्लॅन्सची किमंत 219 रुपयांपासून सुरु

टेलिकॉम कंपनी रिलायन्स JIOने क्रिकेट लव्हर्ससाठी नवीन क्रिकेट प्लॅन जाहीर केला आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2023 लक्षात घेऊन हे प्लॅन्स सादर करण्यात आले आहेत. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 GB डेटा आणि फ्री डेटा व्हाउचरचा लाभ मिळेल. या प्लॅनची ​​सुरुवातीची किंमत 219 रुपये आहे. कंपनी आजपासून म्हणजेच 24 मार्च 2023 पासून हे प्लॅन्स उपलब्ध करून देत आहे.

हे सुद्धा वाचा : पावरफुल फीचर्ससह TECNOचा नवा फोन भारतात लाँच, अगदी तुमच्या बजेटमध्ये येणार किंमत

Jio चा 219 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

Jio च्या 219 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 3GB डेटाचा लाभ मिळतो. प्लॅनसोबत 14 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 25 रुपयांचे फ्री व्हाउचर देखील उपलब्ध असतील. वापरकर्ते प्लॅनसह उपलब्ध असलेल्या मोफत व्हाउचरमधून 2GB अतिरिक्त डेटा देखील घेऊ शकतील.

Jio चा 399 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्येही दररोज 3GB डेटाचा लाभ मिळतो. 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण 28 दिवस अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. प्लॅनसह तुम्हाला 61 रुपयांचे मोफत व्हाउचर मिळेल, जे तुम्हाला 6GB डेटा जोडण्याची परवानगी देईल.

Jio चा 999 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

जिओच्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला तीन महिन्यांची वैधता मिळते. प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅनच्या इतर फीचर्समध्ये, 241 रुपयांचे मोफत व्हाउचर उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही गरज पडल्यास 40GB पर्यंत अतिरिक्त डेटाचा लाभ घेऊ शकाल.

Jioचे क्रिकेट डेटा ऍड-ऑन प्लॅन

Jioने या तीन प्लॅनसह तीन नवीन ऍड-ऑन प्लॅन्सही लाँच केले आहेत. या प्लॅनमध्ये 50 GB, 100 GB आणि 150 GB पर्यंत अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. सर्वात स्वस्त क्रिकेट डेटा ऍड-ऑन प्लॅनची ​​किंमत 222 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 50 जीबी डेटा ऍड-ऑन करता येतो. Jio च्या 444 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 60 दिवसांची वैधता आणि 100 GB डेटा मिळेल. तर, 667 रुपयांच्या प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता आणि 150GB डेटा उपलब्ध असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo