16 डिसेंबरला लॉन्च होईल VIVO चा 5G SMARTPHONE VIVO X30

HIGHLIGHTS

दोन फोन केले जातील लॉन्च

16 डिसेंबरला लॉन्च होईल VIVO चा 5G SMARTPHONE VIVO X30

Vivo ने आपल्या आगामी 5G smartphone Vivo X30 संबंधित अनेक टीजर जारी केले आहेत आणि कंपनीने स्मार्टफोनच्या लॉन्चची date सांगितली आहे. कंपनीने सांगितले आहे कि Vivo X30 16 डिसेंबरला चीन मध्ये अधिकृतपणे लॉन्च केला जाईल. कंपनी या इवेंट मध्ये दोन डिवाइसेज Vivo X30 आणि Vivo X30 Pro लॉन्च करू शकते जे SA आणि NSA 5G मोड्सला सपोर्ट करतील. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हा कंपनीचा पहिला डुअल-मोड 5G फोन आणि कंपनीच्या X सीरीजचा पहिला 5G फोन पण असेल. आधी सांगण्यात आले आहे डिवाइस सॅमसंगच्या एक्सिनोस 980 SoC चिपसेट सह येईल. 

Samsung च्या एक्सिनोस 980 5G बेसबँड सह इंटीग्रेटेड केला गेला आहे आणि हा जगातील पहिला चिपसेट आहे 5G मॉडेम सह इंटीग्रेट केला गेला आहे. हा कोर्टेक्स A77 आर्किटेक्चरचा वापर करतो. 

काही दिवसांपूर्वी कंपनीने चीनच्या माइक्रोब्लोगिंग प्लॅटफार्म वर Vivo X30 लाइनअप संबंधित तीन प्रमोशनल विडियो शेअर केले आहे ज्यात फोनच्या कॅमेर्‍या संबधीत माहिती समजली आहे. 

नवीन टीजर वरून खुलासा झाला आहे कि स्मार्टफोन डेडिकेटेड पोर्ट्रेट कॅमेर्‍यासह येईल जो 5x पेरीस्कोप झूम कॅमेर्‍यासह येईल. तसेच कंपनीने असा पण दावा केला आहे की हा 50mm लेंस सह प्रोफेशनल कॅमेरा शॉट्सला पण मात देईल. 

अजून एका टीजर विडियो मध्ये पेरीस्कोप सुपर-टेलीफोटो लेंस कडे इशारा करण्यात आला आहे. तसेच तिसर्‍या टीजर मध्ये विवोने 60x Zoom दाखवला आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo