Reliance Jio कडून आपल्या Rs 198 आणि Rs 299 वाल्या प्लान्स सोबत Samsung Galaxy M सीरीजच्या यूजर्स साठी डबल डेटा ऑफर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा डबल डेटा तुम्हाला वाउचर्सच्या स्वरूपात मिळणार आहे. यूजर्सना मनुअली हा एक्टिवेट करावा लागेल.
सॅमसंग ने गेल्याच आठवड्यात आपल्या Samsung Galaxy M10 आणि Samsung Galaxy M20 मोबाईल फोन्स लॉन्च केले आहेत. हे मोबाईल फोन्स अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून खरेदीसाठी पण उपलब्ध झाले आहेत. पण सॅमसंगने हे कमी किंमतीत लॉन्च केल्यामुळे हे डिवाइस थोड्याच वेळात स्टॉक आउट झाले होते. पण सॅमसंग कडून त्यांनी या स्मार्टफोन्सचे किती यूनिट सेल केले आहेत हे समोर आले नाही. पण तुम्हाला सांगू इच्छितो कि या स्मार्टफोन्सचा पुढील सेल उद्या म्हणजे 7 फेब्रुवारीला पुन्हा एकदा होणार आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
याचा अर्थ असा कि जर तुम्ही याच्या पहिल्या सेल मध्ये हा विकत घेऊ शकला नसाल तर तुम्हाला अजून एक संधी कंपनी कडून मिळत आहे. पण आता याच्या दुसऱ्या सेलच्या आधीच टेलीकॉम कंपनी रिलायंस जियोने एक मोठी घोषणा केली आहे. जर आपण ‘Jio Samsung Galaxy M Series Offer’ बघितली तर आपल्याला समजेल कि कंपनी कडून आपल्या Rs 198 आणि Rs 299 वाल्या प्रीपेड प्लान्स सोबत डबल डेटा ऑफर केला जात आहे. याचा अर्थ असा कि जर तुम्ही रिलायंस जियो कडून आपल्या सॅमसंग गॅलेक्सी M सीरीजच्या स्मार्टफोन मध्ये Rs 198 किंवा Rs 299 चा प्लान घेतला तर तुम्हाला रिलायंस जियो कडून डबल डेटा दिला जाणार आहे.
तुम्हाला तर माहीतच आहे कि रिलायंस जियो गेल्या काही काळापासून अनेक स्मार्टफोन्स कंपन्यांसोबत भागेदारी केली आहे आणि सॅमसंग सोबत करण्यात आलेली हि भागेदारी काही नवीन नाही. पण जर तुम्ही जियो कडून त्यांचे Rs 198 किंवा Rs 299 चे प्रीपेड प्लान्स आपल्या सॅमसंग गॅलेक्सी M10 किंवा सॅमसंग गॅलेक्सी M20 सोबत घेतलेत तर तुम्हाला रिलायंस जियो जो डेटा या प्लान्स मध्ये देत आहे, त्याच्या दुप्पट मिळणार आहे.
लक्षात घ्या रिलायंस जियोचा Rs 198 मध्ये येणार प्रीपेड प्लान तुम्हाला रोज 2GB डेटा ऑफर करतो, तसेच जर Rs 299 मध्ये यांच्या प्रीपेड प्लान बद्दल बोलायचे झाले तर हा प्लान कंपनी कडून 3gb डेटा डेली ऑफर सह येतो. पण आता या दोन्ही प्लान्स मध्ये तुम्हाला दुप्पट म्हणजे Rs 198 मध्ये येणाऱ्या प्रीपेड प्लान मध्ये तुम्हाला 4GB डेली डेटा मिळणार आहे, तसेच Rs 299 मध्ये येणाऱ्या प्रीपेड प्लान मध्ये तुम्हाला 6GB डेली डेटा मिळणार आहे. पण हि ऑफर पहिल्या 10 रिचार्ज पर्यंत मर्यादित राहणार आहे.