Kult Impulse स्मार्टफोन एका मोठ्या आणि दमदार बॅटरी सह फक्त Rs 8,999 च्या किंमतीत झाला लॉन्च

HIGHLIGHTS

Kult ने 2018 मधील आपला पहिला स्मार्टफोन Kult Impulse स्मार्टफोन फक्त Rs 8,999 च्या किंमतीत लॉन्च केला आहे.

Kult Impulse स्मार्टफोन एका मोठ्या आणि दमदार बॅटरी सह फक्त Rs 8,999 च्या किंमतीत झाला लॉन्च

Xiaomi Redmi 5 स्मार्टफोन ला भारतात टक्कर देण्यासाठी कमी किंमतीत एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. Kult ने भारतात 2018 मधील आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला आहे, हा डिवाइस कंपनी ने Kult Impulse नावाने लॉन्च केला आहे. हा कंपनी ने एयरटेल, Vodafone आणि Idea Cellular च्या VoLTE सह लॉन्च केला आहे. आधी सांगितल्याप्रमाणे हा डिवाइस कंपनी ने Xiaomi Redmi 5 स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी सादर केला आहे. 
फोन मध्ये तुम्हाला मीडियाटेक चा प्रोसेसर मिळत आहे, हा डिवाइस आज पासून Rs 8,999 च्या किंमतीत विकत घेता येईल. या स्मार्टफोन सोबत तुम्हाला Rs 2,200 ची कॅशबॅक ऑफर पण मिळत आहे. ही ऑफर तुम्हाला रिलायंस जियो कडून मिळत आहे, या डिवाइस ची सर्वात खास बाब म्हणजे यात एक 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे.  
Kult Impulse फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
या डिवाइस मध्ये तुम्हाला 5.99-इंचाचा एक HD+ डिस्प्ले मिळत आहे. जो 720×1440 पिक्सल सह फोन मध्ये आहे, त्याचबरोबर तुम्हाला एक 2.5D ची कर्व ग्लास मिळत आहे. फोन मध्ये एक मीडियाटेक चा MT6739 प्रोसेसर मिळत आहे. याचा क्लॉक स्पीड 1.5GHz आहे. 
फोन मधील स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला 3GB च्या रॅम सह 32GB ची इंटरनल स्टोरेज मिळत आहे, तसेच ही स्टोरेज तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही 64GB पर्यंत वाढवू शकता. फोन एंड्राइड नौगट वर चालतो. कदाचीत हा डिवाइस Oreo वर येईल पण याबद्दल अजूनतरी काही माहिती समोर आली नाही.  
फोन मध्ये एक 13-मेगापिक्सल चा रियर आणि एक 13-मेगापिक्सल चाच फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे. दोन्ही कॅमेरा सह तुम्हाला ड्यूल टोन LED फ्लॅश मिळत आहे. त्याचबरोबर यात तुम्हाला एक 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी पण मिळत आहे
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo