Reliance Jio आणि एयरटेल आणणार आहेत अॅप्पल वॉच सीरीज 3 चा सेलुलर वेरिएंट

HIGHLIGHTS

अॅप्पल वॉच सीरीज 3 चा सेलुलर वर्जन भारतात लॉन्च होणार आहे आणि हे काम रिलायंस जियो आणि एयरटेल करणार आहेत.

Reliance Jio आणि एयरटेल आणणार आहेत अॅप्पल वॉच सीरीज 3 चा सेलुलर वेरिएंट

अॅप्पल वॉच सीरीज 3 चा सेलुलर वर्जन भारतात लॉन्च होणार आहे आणि हे काम रिलायंस जियो आणि एयरटेल करणार आहेत. एयरटेल ने आता काही दिवसांपूर्वी ही घोषणा केली आहे की अॅप्पल वॉच सीरीज 3 एयरटेल ऑनलाइन स्टोर वर उपलब्ध होणार आहे आणि हा एयरटेल च्या 4G नेटवर्क वर चालेल. याव्यतिरिक्त रिलायंस जियो ने पण याची घोषणा केली आहे की हा तुम्ही जियो.कॉम वरून घेऊ शकता. 
तसेच तुम्ही हा रिलायंस डिजिटल आणि देशभरातील जियो स्टोर्स मधून घेऊ शकता. त्याचबरोबर कंपनी ने या वॉच साठी नवीन सेवा पण लॉन्च केले आहे. तसेच या दोन्ही कंपन्यांनी या वॉच साठी प्री-रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया पण सुरु केली आहे, तुम्ही 4 मे पासून यासाठी या प्रक्रिया मध्ये भाग घेऊ शकता. पण याची शिपिंग तुमच्या पर्यंत 11 मे ला होईल. 
रिलायंस जियो कडून लॉन्च केल्या गेलेल्या या नवीन सेवे विषायी बोलायचे झाले तर ही सेवा “JioEverywhereConnect” नावाने लॉन्च केली गेली आहे. या सेवे च्या माध्यमातून जियो यूजर्स आपल्या त्याच नंबर ने हे वॉच पण वापरू शकतात. यासाठी तुम्हाला हा तुमच्या फोन सोबत ठेवण्याची पण गरज नाही. 
या सेवे अंतर्गत जियो यूजर्सना दोन वेगवेगळ्या डिवाइस साठी एकच नंबर दिला जाणार आहे. हा तुमच्या अॅप्पल iPhone आणि अॅप्पल वॉच सीरीज 3 साठी असणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त चार्ज पण द्यावा लागणार नाही, एवढ नक्की की तुम्हाला या सेवे साठी एकदा सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. 
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo