आज दुपारी 12 वाजता एकदा पुन्हा सेल साठी येणार आहेत Xiaomi Redmi Note 5 आणि Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन

HIGHLIGHTS

Xiaomi Redmi Note 5 आणि Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोंसना आज दुपारी 12 वाजल्यापासून मी.कॉम च्या माध्यमातून विकत घेतला जाऊ शकतो.

आज दुपारी 12 वाजता एकदा पुन्हा सेल साठी येणार आहेत Xiaomi Redmi Note 5 आणि Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन

Xiaomi Redmi Note 5 आणि Xiaomi Redmi Note 5 Pro चा अजून एक फ्लॅश सेल 5 एप्रिल म्हणजे आज Mi.com वर होणार आहे, हा सेल आज दुपारी 12 वाजता कंपनी च्या अधिकृत वेबसाइट च्या माध्यामातून होईल, जर तुम्ही हे दोन्ही स्मार्टफोंस अजूनपर्यंत विकत घेऊ शकला नसाल तर आज तुमच्याकडे एक संधी आहे. या सेल मध्ये तुम्ही या दोन्ही स्मार्टफोंस चे सर्व स्टोरेज वेरिएंट विकत घेऊ शकाल. तुम्ही हे स्मार्टफोंस Mi.com च्या माध्यमातून 12 वाजल्यापासून सुरू होणार्‍या सेल मधून घेऊ शकता. 
Xiaomi Redmi Note 5 आणि Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोंस ची किंमत आणि यांसोबत मिळणार्‍या ऑफर्स बद्दल बोलायचे झाले तर Xiaomi Redmi Note 5 स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंटस मध्ये घेतला जाऊ शकतो. 
हा स्मार्टफोन 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज सह फक्त Rs. 9,999 च्या किंमतीत विकत घेतला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त याचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट Rs. 11,999 च्या किंमतीत विकत घेतला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन तुम्ही काही रंगांच्या ऑप्शन मध्ये घेऊ शकता. जसे की ब्लॅक, गोल्ड, लेक ब्लू, आणि रोज गोल्ड रंगात घेऊ शकता. 
जर दुसरा मॉडेल म्हणजे Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन पण दोन वेगवेगळ्या वेरिएंटस मध्ये सादर करण्यात आला आहे. याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट तुम्ही Rs. 13,999 च्या किंमतीत विकत घेऊ शकता, तसेच याच्या 6GB रॅम वाला वेरिएंट ची किंमत Rs. 16,999 आहे. हा स्मार्टफोन पण तुम्हाला काही रंगांच्या ऑप्शन मध्ये मिळेल. हा स्मार्टफोन पण तुम्ही ब्लॅक, गोल्ड, लेक ब्लू, आणि रोज गोल्ड सारख्या रंगात घेऊ शकता. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

जसे की तुम्हाला माहित आहे की या महिन्याच्या सुरुवातीला हे स्मार्टफोंस लॉन्च करताना कंपनी ने जियो सोबत हात मिळवणी केली होती आणि त्यामुळेच तुम्हाला या स्मार्टफोंस सह Rs. 2200 कॅशबॅक वाउचरस मिळत आहे, याव्यतिरिक्त तुम्हाला जवळपास 4.5GB पर्यंतचा 4G डेटा पण यासोबत दिला जात आहे. तसेच हे दोन्ही स्मार्टफोंस अल्ट्रा-स्लिम केस सोबत येत आहेत. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo