HP ने आणला एक असा पॉवरबँक जो करेल, तुमच्या लॅपटॉपला चार्ज

HIGHLIGHTS

ह्या पॉवर बॅकपॅक असे संबोधित करण्यात आले आहे. ह्या बॅगची किंमत १९९ डॉलर (जवळपास १३,३०० रुपये) आहे. ह्यात 22400mAh ची बॅटरी दिली गेली आहे.

HP ने आणला एक असा पॉवरबँक जो करेल, तुमच्या लॅपटॉपला चार्ज

सध्या स्मार्टफोन वापरणा-या बहुतांशी यूजर्सजवळ पॉवरबँक्स पाहायला मिळतात, ज्यामुळे प्रवासादरम्यान आपण आपला मोबाईल चार्ज करु शकतो. मात्र प्रवासादरम्यान अशी समस्या आणखी एका डिवाइसविषयी निर्माण होते, ती म्हणजे लॅपटॉप. लॅपटॉपची बॅटरी कमी झाल्यास काय करता येईल, ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पॉवरबॅकअप.  HP ने ह्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पॉवर बॅकअप लाँच केला आहे. ह्याची किंमत १९९ डॉलर (जवळपास १३,३०० रुपये) आहे. हा अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हा डिवाइस 22400mAh ची बॅटरी लाइफ देतो, ज्याने आपण अगदी सहजपणे आपला लॅपटॉप चार्ज करु शकता. ह्या पॉवर बॅकअपमध्ये मॉनिटर्स तापमानासाठी हिट सेंसर दिला आहे. ह्या बॅगमध्ये चार्जिंग लॅपटॉप्ससह मायक्रो-USB केबलद्वारा दो डिवायसेससुद्धा दिले आहेत.

हेदेखील पाहा – [Marathi] LeEco Super 3 TVs – LeEco सुपर 3 टीव्ही फर्स्ट लूक

ह्या बॅगचा बाहेरील भाग कॅनवासने बनलेला आहे, ह्याचा आत पॅडिंगचा वापर केला गेला आहे. पावसाळ्यात हा खूप फायदेशीर आहे. हा १ ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल.

हेदेखील वाचा – १६ ऑगस्टला लाँच होणार Le Eco-coolpad कूल 1 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून क्रिओ मार्क 1 च्या किंमतीत 30 टक्क्यांची घट

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo