लेनोवो आयडियापॅड 110 लॅपटॉप भारतात लाँच, किंमत २०,४९० रुपयांपासून सुरु

HIGHLIGHTS

हा इंटेल पेंटियम क्वाड-कोर प्रोसेसर आणि 4GB DDR3 रॅमने सुसज्ज आहे. ह्याची रॅम 8GB पर्यंत वाढवू शकतो.

लेनोवो आयडियापॅड 110 लॅपटॉप भारतात लाँच, किंमत २०,४९० रुपयांपासून सुरु

लेनोवोने भारतीय बाजारा आपला नवीन लॅपटॉप आयडियापॅड 110 लाँच केला आहे. हा लॅपटॉप ईबोनी ब्लॅक रंगात मिळेल आणि हा भारतात असलेल्या रिटेल स्टोर्समध्ये सुद्धा उपलब्ध होईल. ह्याची किंमत २०,४९० रुपयांपासून सुरु होते आणि २४,९९० रुपयांपर्यंत जाते.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

कंपनीने ह्यासोबत 3 वर्षांची अतिरिक्त वॉरंटी दिली आहे. त्याचबरोबर ह्यासोबत १ वर्षाचा ADP कव्हरसुद्धा मिळत आहे. त्यासाठी ग्राहकांना केवळ ५९९ रुपये द्यावे लागतील.

हेदेखील पाहा – [Marathi] Coolpad Max Unboxing – कूलपॅड मॅक्स अनबॉक्सिंग

ह्या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाची HD IPS डिस्प्ले आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1366×768 पिक्सेल आहे. हा इंटेल पेंटियम क्वाड-कोर प्रोसेसर आणि 4GB DDR3 रॅमने सुसज्ज आहे. ह्याच्या रॅमला 8GB पर्यंत वाढवू शकतो.

हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स

ह्यात 1TB ची SSD सुद्धा आहे. हा लॅपटॉप विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ह्यात वेबकॅमसुद्धा मिळत आहे. ह्यात ब्लूटुथ, वायफाय, DVD/CD-RW ड्राइव, USB 3.0 आणि HDMI पोर्टसुद्धा आहे. ह्याचा आकार 37x265x22.9mm आणि २.२किलो आहे.

हेदेखील वाचा – एअरटेल, आयडिया, वोडाफोनने लागू केले GSMA मोबाईल कनेक्ट सोल्युशन

हेदेखील वाचा – नोकियाच्या स्मार्टफोन्समध्ये असणार 2K डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर?

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo