ओपन सेलमध्ये उपलब्ध झाला लेनोवो वाइब K5 स्मार्टफोन

HIGHLIGHTS

ओपन सेलमध्ये हा स्मार्टफोन ६,९९९ रुपयात खरेदी करु शकता.

ओपन सेलमध्ये उपलब्ध झाला लेनोवो वाइब K5 स्मार्टफोन

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा लेनोवो वाइब K5 ६,९९९ रुपयात

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

लेनोवो वाइब K5 स्मार्टफोन आज ओपन सेलमध्ये उपलब्ध झाला आहे. ह्या स्मार्टफोनला ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावरुन खरेदी करु शकता. कंपनीने अलीकडेच ह्या स्मार्टफोनला भारतात लाँच केले होते. तसेच कंपनीने फ्लॅश सेलचे सुद्धा आयोजन केले होते. ओपन सेलमध्ये ह्या स्मार्टफोनला ६,९९९ रुपयाच्या किंमतीत खरेदी करु शकता.

ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले दिली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा फोन 1.2GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 415 प्रोसेसर आणि 2GB च्या DDR3 रॅमने सुसज्ज आहे. फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ह्या स्टोरेजला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

हेदेखील वाचा – पावसाळ्याच्या दिवसात खूपच फायद्याचे ठरतील हे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स

ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा फोन 2750mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. ह्याचे वजन 142x71x8.2mm आणि वजन 150 ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय, ब्लूटुथ सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

 

हेदेखील वाचा – “फ्रीडम 251” स्मार्टफोनची डिलिवरी लांबणीवर, ६ जुलैपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा
हेदेखील वाचा – HTC डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोनची किंमत झाली कमी

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo