स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह येतात मोटोरोलाचे हे नवीन स्मार्टफोन्स

HIGHLIGHTS

मोटोरोलाने मोटो Z आणि मोटो Z फोर्स स्मार्टफोन लाँच केले. ह्या स्मार्टफोन्समध्ये 5.5 इंचाची QHD AMOLED डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर देण्यात आला आहे.

स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह येतात मोटोरोलाचे हे नवीन स्मार्टफोन्स

मोटोरोलाने बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स मोटो Z आणि Z फोर्स लाँच केले आहे. हे एकाच फोनचे दोन व्हर्जन आहेत. मोटो Z थोडा पातळ आहे, तर दुस-या स्मार्टफोनमध्ये एक मोठी बॅटरी आणि एक शटरशील्ड स्क्रीन देण्यात आली आहे, ज्याविषयी कंपनीने दावा केला आहे की, हा पडल्यावरही तुटत नाही.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

मोटो Z स्मार्टफोन 5.2mm इतका पातळ आहे आणि ह्याला एयरक्राफ्ट-ग्रेड अॅल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलने बनवले गेले आहे. ह्यात 5.5 इंचाची QHD AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 4GB चे रॅमसुद्धा देण्यात आली आहे. हा फोन 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. रियर कॅमेरा लेजर ऑटोफोकस, OIS आणि ड्यूल-टोन LED फ्लॅशने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलच फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात एक फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा दिला गेला आहे. हा डिवाइस 2600mAh बॅटरीने सुसज्जआ आहे. ह्यात USB टाइप-C कनेक्टर दिले गेले आहे आणि हा अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर चालतो.

हेदेखील पाहा – 3GB रॅमसह येणारे १० बजेट स्मार्टफोन्स

तर मोटो X फोर्स 6.99mm इतका पातळ आहे. ह्यात 3500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्या फोनमध्ये २१ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्याच्या रियर कॅमे-यामध्ये फेज डिटेक्शन ऑटोफोकस फीचरसुद्धा आहेत. त्याशिवाय इतर फीचर्स मोटो Z सारखेच आहेत.

हेदेखील वाचा – लेनोवोच्या प्रोजेक्ट टँगोवर आधारित असलेला PHAB 2 प्रो स्मार्टफोन लाँच

हेदेखील वाचा – Envent LiveFree 570, 530 वॉटरप्रूफ ब्लूटुथ स्पीकर्स लाँच, किंमत अनुक्रमे ३९९९ रुपये, २४९९ रुपये

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo