पुर्णपणे अॅल्युमिनियमने बनवलेले इंटेक्स आयरिस प्रो स्मार्टवॉच झाले लाँच

HIGHLIGHTS

ह्या डिवाइसची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा अॅल्युमिनियमने बनवला गेला असून, ह्यात 2.5D ग्लास देण्यात आली आहे.

पुर्णपणे अॅल्युमिनियमने बनवलेले इंटेक्स आयरिस प्रो स्मार्टवॉच झाले लाँच

फ्लिपकार्टवर खरेदी करा इंटेक्स आयरिश प्रो स्मार्टवॉच केवळ ४,९९९ रुपयात

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

फ्लिपकार्टवर खरेदी करा इंटेक्स आयरिश प्रो स्मार्टवॉच केवळ ४,९९९ रुपयात
 

इंटेक्सने बाजारात आपला नवीन स्मार्टवॉच आयरिस्ट प्रो लाँच केला आहे. हा डिवाइस ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होईल. कंपनीने ह्या डिवाइसची किंमत ४,९९९ रुपये ठेवली आहे. ह्या डिवाइसची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्याला अॅल्युमिनियमने बनविण्यात आले असून, ह्यात 2.5D ग्लास देण्यात आली आहे. ह्यात ब्लूटुथ फीचरसुद्धा देण्यात आले आहे आणि हा काळा आणि मस्टर्ड रंगात विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्या डिवाइसला कंपनीच्या साइटवर देखील लिस्ट करण्यात आले आहे.

ह्या डिवाइसमध्ये जी डिस्प्ले दिली आहे, त्याचे रिझोल्युशन 240×240 पिक्सेल आहे. कंपनीचा दावा आहे की, सूर्यप्रकाशातही ह्या डिस्प्लेवर स्पष्ट दिसते आणि डिस्प्ले बंद झाल्यानंतरसुद्धा ह्याच्या डिस्प्लेवर वेळ दिसते.

हेदेखील पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग

ह्या डिवाइसमध्ये एक इन-बिल्ट पॅडोमीटर देण्यात आले आहे, जो तुमची पावले मॉनिटर करतो. त्याचरोबर तुमचे कॅलरिजही मोजतो. ह्या स्मार्टवॉचचा पट्टा तुम्ही बदलू शकता. ह्यात एक 64GB चे रॅम आणि 128GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. हा 4000mAh बॅटरीने सुसज्ज आहे.

हेदेखील वाचा – आज केवळ १ रुपयात मिळणार वनप्लस 3 चा VR हेडसेट
हेदेखील वाचा – लाँच झाला जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन, पाहा किती आहे ह्याची किंमत?

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo