२०१७ मध्ये सॅमसंग लाँच करणार फोल्ड होणारा स्मार्टफोन?

HIGHLIGHTS

ET न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, ह्या वर्षाअखेरीस सॅमसंग आपला फोल्डेबल स्मार्टफोन उत्पादित करणे सुरु करेल आणि कदाचित हा स्मार्टफोन पुढील वर्षी बाजारात उपलब्ध होईल.

२०१७ मध्ये सॅमसंग लाँच करणार फोल्ड होणारा स्मार्टफोन?

सध्या स्मार्टफोन जगतात होणारी क्रांती पाहता, मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगही नवनवीन प्रयोग करताना दिसतेय. त्याचेच एक उदाहरण म्हणजे कदाचित पुढील वर्षी सॅमसंग स्वत:चा फोल्डेबल

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

स्मार्टफोन लाँच करेल.
 

कोरियन वेबासाइट ET न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीन फोल्डेबल डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनचे उत्पादन ह्या वर्षाअखेरिस सुरु करेल आणि कदाचित हा स्मार्टफोन पुढील वर्षी बाजारात उपलब्ध होईल.५ इंचाचा हा स्मार्टफोन जेव्हा आपण उघडू तेव्हा हा ७ इंचाच्या टॅबलेट सारखा दिसतो, असेही  ह्या अहवालात म्हटले आहे.

सॅमसंगने २०१४ मध्ये  ह्या स्मार्टफोनसाठी पेटंट घेतले होते आणि गेल्या वर्षी अशी अफवाही समोर येत होती, की ह्या वर्षी जानेवारीमध्ये हा स्मार्टफोन येईल. मात्र आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग ह्याला दोन वेगवेगळ्या भागात टेस्ट करेल. एक म्हणजे स्नॅपड्रॅगन 620 (नंतर तो स्नॅपड्रॅगन 652) झाला आणि दुसरा स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर. तसेच हा फोन 3GB रॅम, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि नॉन-रिमूव्हेबल बॅटरीसह येईल, असेही सांगण्यात येतय.  

हेदेखील वाचा – वनप्लस X च्या किंमतीत झाली मोठी घट

हेदेखील वाचा – हिरेजडित असलेल्या सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचची किंमत आहे १० लाख रुपये

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo