६ एप्रिलला लाँच होऊ शकतो मिजू M3 नोट स्मार्टफोन

HIGHLIGHTS

कंपनीने ह्या कार्यक्रमात आपल्या विबो अकाउंटवर माहिती दिली आहे. ह्या कार्यक्रमात कंपनीने आपली एक खास वेबसाइटसुद्धा लाँच केली आहे.

६ एप्रिलला लाँच होऊ शकतो मिजू M3 नोट स्मार्टफोन

मोबाईल निर्माता कंपनी मिजू ६ एप्रिलला एका कार्यक्रमाचे आयोजन करत आहे आणि आशा आहे की, ह्या कार्यक्रमात कंपनी आपला एक नवीन फोन M3 नोट लाँच करेल.
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

कंपनीने ह्या कार्यक्रमात आपल्या विबो अकाउंटवर माहिती दिली आहे. ह्या कार्यक्रमात कंपनीने आपली एक खास वेबसाइटसुद्धा लाँच केली आहे.

ह्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीवरुन कंपनी ६ एप्रिलला हा फोन लाँच करेल, असे कुठेही म्हटलेही नाही. मात्र असे लिहिले आहे की, “प्रिटी फास्ट, थिन, लाँग लास्टिंग”. हे तीन शब्द मिजू M3 नोटच्या प्रोसेसर, बिल्ड आणि बॅटरीचा इशारा देत आहे.

अलीकडेच समोर आलेल्या गिजचायनाच्या रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले होते की, मिजू M3 नोट स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची डिस्प्ले असेल. त्याचबरोबर ह्या फोनमध्ये हेलियो X10 मिडियाटेक MT6795 चिपसेट आणि 2GB ची रॅम असू शकते. फोनमध्ये  3200mAh ची बॅटरी आणि 16/32GB चे अंतर्गत स्टोरेज पर्यायसुद्धा असेल.

 

ह्या रिपोर्टमध्ये ह्या फोनच्या किंमतीविषयी माहिती दिली गेली होती. त्यानुसार मिजू M3 नोटमध्ये 16GB च्या मॉडलची किंमत 799 चीनी युआन (जवळपास ८,००० रुपये) आणि ३२जीबीच्या प्रकाराची किंमत 999 चीनी युआन (जवळपास १०,००० रुपये) असल्याची माहिती दिली गेली आहे.

हेदेखील वाचा – १००० च्या किंमतीत येणारे सर्वोत्कृष्ट हेडफोन्स

हेदेखील वाचा – लाइव व्हिडियोसाठी यूट्युब कनेक्ट अॅपवर यूट्यूबचे युद्धपातळीवर काम सुरु

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo