ICC WT20 सुरु झाली आहे आणि भारतात गुगलच्या चाहत्यांची संख्या आणि त्यांची क्रिकेट प्रति असलेली ओढ लक्षात घेता गुगलने “लाइव कॉमेंट्री” फीचर सुरु करण्याच्या प्रयत्न सुरु केला आहे. आणि त्यासाठी त्यांनी चाचणीही सुरु केली आहे.
ICC WT20 सुरु झाली आहे आणि भारतात गुगलच्या चाहत्यांची संख्या आणि त्यांची क्रिकेट प्रति असलेली ओढ लक्षात घेता गुगलने “लाइव कॉमेंट्री” फीचर सुरु करण्याच्या प्रयत्न सुरु केला आहे. आणि त्यासाठी त्यांनी चाचणीही सुरु केली आहे. ह्या फीचरच्या माध्यमातून आता आपण क्रिकेटच्या लाइव कॉमेंट्रीचा आनंद घेऊ शकाल. ह्या फीचरच्या माध्यमातून आपण अगदी सहजपणे आपल्याला ज्या मॅचची लाइव कॉमेंट्री ऐकायची आहे, त्या किंवा अन्य कोणत्याही मॅचला शोधा आणि त्यानंतर तुम्ही ती मॅच पाहू शकाल. ह्या फीचरच्या माध्यमातून तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटशी संबंधित असलेल्या सर्व लोकांबद्दलही माहिती मिळेल.
Survey
✅ Thank you for completing the survey!
हा फीचर केवळ लाइव मॅचसाठी नाही तर आपण मॅच झाल्यानंतरही ह्याचा उपयोग करु शकता. त्याशिवाय हा फीचर तुम्हाला आणखी अनेक प्रकारची माहिती देणार आहे, जसे की ह्याद्वारे आपण टीम, त्याचे खेळाडू इत्यादींविषयी माहिती घेऊ शकतो. त्याशिवाय आपण ह्या फीचरने लाइव फोटो आणि व्हिडियोसह लाइव ट्विटसुद्धा पाहू शकता. मात्र हे ठराविक मॅचेसपुरताच असेल. जसे की भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दोन्ही सेमीफायनल आणि शेवटची म्हणजेच फायनल सुद्धा पाहू शकता.
मात्र तरीही ह्या फीचरला तेवढे चांगलेही बोलू शकत नाही, कारण आज प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. आणि त्यात असे अनेक अॅप्स आहेत जे मॅचचे प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात.मात्र हा फीचर त्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे, जे ह्या कोणत्याही माध्यमातून मॅच बघू शकत नाही आणि टिव्हीवरही मॅच पाहू शकत नाही. तसेच हा फीचर सध्या इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये उपलब्ध होईल.