विवोने लाँच केला 6GB रॅमसह येणारा पहिला स्मार्टफोन

HIGHLIGHTS

विवोने आपला नवीन स्मार्टफोन Xplay5 Elite लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह लाँच केला गेला आहे.

विवोने लाँच केला 6GB रॅमसह येणारा पहिला स्मार्टफोन

जसे की आपल्या सर्वांनाच माहित असेल की, विवोने आतापर्यंतचा सर्वात पातळ असा स्मार्टफोन विवो X5 मॅक्स लाँच करुन एक नवीन रेकॉर्ड बनवला होता. मात्र आता कंपनी आणखी एक पाऊल पुढे टाकून अजून एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. विवोने जगातील पहिला स्मार्टफोन Xplay5 Elite लाँच केला आहे, ज्यात 6GB चे रॅम दिले आहे. त्याचबरोबर कंपनीने आपला आणखी एक बजेट स्मार्टफोनसुद्धा लाँच केला आहे ज्याचे नाव आहे Xplay5. ह्यात 4GB ची रॅम देण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स विवोने चीनमध्ये झालेल्या एक कार्यक्रमात लाँच केले.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

ड्यूल सिम सपोर्ट करणा-या Xplay5 Elite स्मार्टफोन गोरिल्ला ग्लास 4 ने संरक्षित केला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग गॅलेक्सी S6 सारखी ड्यूल कर्व्ह्ड 5.43 इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले दिली आहे, जी एक QHD पॅनल आहे आणि ज्याचे रिझोल्युशन 1440×2560 पिक्सेल आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये आकर्षक डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये क्वाल-कॉमचे फ्लॅगशिप चिपसेट क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर दिले आहे, जो 2.15GHz च्या स्पीडसह येतो. हे प्रोसेसर आतापर्यंत काही स्मार्टफोन्समध्येच पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये आतापर्यंतची सर्वात जास्त अशी 6GB ची रॅम दिली गेली आहे आणि ह्यात एड्रेनो 530 GPU सुद्धा दिले गेले आहे.

ह्या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात आपल्याला फेज डिटेक्शन ऑटोफोकस, 6P लेन्स, f/2.0 अॅपर्चर आणि ड्यूल टोन LED फ्लॅश मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये 4G LTE सपोर्टसुद्धा आहे. फोनमध्ये आपल्याला 3600mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी पर्यायामध्ये वायफाय 802.11 a/b/g/n/ac, ब्लूटुथ 4.2, GPS, मायक्रो-USB (OTG सह) आहे. फोनमध्ये आपल्याला काही सेंसरसुद्धा दिले आहेत, ज्यात ग्रॅव्हिटी, अॅम्बियंट लाइट, प्रोक्सिमिटी आणि गायरोस्कोप यांचा समावेश आहे.

 

हेदेखील वाचा –  CES 2016 मध्ये लाँच झाले ब्लू विवो 5 आणि विवो XL स्मार्टफोन्स

 

फोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोसह फनटच ओएस 2.6 वर चालतो. स्मार्टफोन चीनमध्ये ८ मार्चपासून मिळण्यास सुरु होईल आणि ह्याची किंमत आहे CNY 4,288 (जवळपास ४४,३०० रुपये).

ह्याच्या दुस-या स्मार्टफोन विवो Xplay5 विषयी बोलायचे झाले तर, हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. ह्यातसुद्धा ड्यूल-कर्व्ह्ड QHD डिस्प्ले दिली आहे. ह्याचा  कॅमेरा, बॅटरी कनेक्टिव्हिटी पर्याय आणि अंतर्गत स्टोरेजसुद्धा एकसारखेच आहे. ह्यात 1.8GHz चे ऑक्टा-कोर क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर दिले गेले आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये आपल्याला 4GB चे रॅमसुद्धा मिळत आहे. फोनची किंमत आहे CNY 3,698 (जवळपास 38,200 रुपये). मात्र हा कधीपासून मिळणे सुरु होईल ह्या बाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.  

हेदेखील वाचा – अॅप्पलचा आयफोन 5Se स्मार्टफोन एक अनबॉक्स्ड फोटो झाला लीक

हेदेखील वाचा – व्हॉट्सअपमध्ये समाविष्ट झाले नवीन शेअरिंग फीचर

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo