जगातील पहिला मोड्यूलर स्मार्टफोन फेअरफोन २ लाँच

HIGHLIGHTS

ज्या स्मार्टफोनला फेअरफोनने बाजारात आणले आहे त्या स्मार्टफोनला फेअरफोन २ असे नाव दिले आहे. हा फेअरफोन २ डिसेंबरपासून आपल्यापर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल.

जगातील पहिला मोड्यूलर स्मार्टफोन फेअरफोन २ लाँच

कंपनीने आपल्या मागील स्मार्टफोनला २०१३मध्ये लाँच केले होते आणि आता ज्या स्मार्टफोनला फेअरफोनने बाजारात आणले आहे त्या स्मार्टफोनला फेअरफोन २ असे नाव दिले आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, ह्या स्मार्टफोनला कंपनीने पहिला मो़ड्यूलर स्मार्टफोन म्हणून लाँच केले आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

ह्या स्मार्टफोन फेअरफोन २ ची किंमत EUR 529380(जवळपास ३८,००० रुपये) ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला डिसेंबरपासून मिळणे सुरु होईल. कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी हेबेर्ट कंपनीच्या ह्या दुस-या स्मार्टफोनविषयी बोलताना म्हणाले की, “ह्या स्मार्टफोनला काही विशेष रुपात तयार केले आहे.” तसेच हा एक मोड्यूलर स्मार्टफोन म्हणून ओळखला जाईल. असेही ते म्हणाले. मात्र हा स्मार्टफोन केवळ युरोपसाठीच बनवला गेला आहे.

ह्या स्मार्टफोनला जोलासोबत मिळून ह्याचे ऑपरेटिंग सिस्टम बनवले आहेत. दोन्ही कंपन्यांनी मिळून सेलफिश ओएसचे कस्टमाइज्ड व्हर्जन बनवले आहे. आणि जोपर्यंत हा पुर्णपणे तयार होणार नाही, तोपर्यंत हा स्मार्टफोन ५.१ लॉलीपॉपवर आपल्याला मिळेल.

 

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची FHD (1080×1920 पिक्सेल) LCD TFT डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्या स्क्रीनसोबत कोर्निंग गोरिला ग्लास प्रोटेक्शन दिले गेले आहे. स्मार्टफोनमध्ये क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन ८०१ प्रोसेसर दिले गेले आहे, जे २.२६GHz ची गती देतात. त्याचबरोबर ह्यात 2GB रॅमसुद्धा आपल्याला मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये 32GB अंतर्गत स्टोरेजसह चांगला पर्याय मिळत आहे. हा स्मार्टफोन ड्यूल सिम आधारित असण्यासोबत 2G,3G आणि 4G LTE ला सपोर्ट करतो.

त्याशिवाय फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये आपल्याला 2420mAh क्षमता असलेली बॅटरीसुद्धा मिळत आहे. जी खूप वेळ चालेल. स्मार्टफोनमध्ये आपल्याला काही सेंसरसुद्धा मिळत आहेत जसे की, एम्बियंट लाइट सेंसर, प्रोक्सिमिटी, कम्पास, एक्सेलेरोमीटर आणि गायरोस्कोप.

Ashvani Kumar

Ashvani Kumar

Ashvani Kumar is Tech, Politics, and Sports lover. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo