प्रसिद्ध टेक निर्माता Redmi ने Redmi Watch Move स्मार्टवॉच अखेर भारतात लाँच केली आहे. हे स्मार्टवॉच वापरकर्त्यांना परवडणाऱ्या किमतीत उत्तम फीचर्स प्रदान करेल. कंपनीने ही वॉच पॉकेट फ्रेंडली बजेटमध्ये लाँच केली आहे. हा डिस्प्ले ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचरने सुसज्ज आहे. ही स्मार्टवॉच एकदा चार्ज केल्यानंतर 14 दिवसांपर्यंत बॅटरी देईल. एवढेच नाही तर, यात क्विक चार्ज सपोर्ट देखील आहे. चला तर मग जाणून घेऊयात Redmi Watch Move ची किंमत आणि स्पेक्स-
Also Read: Price Drop! लेटेस्ट OnePlus 13 च्या किमतीत तब्बल 9000 रुपयांची घसरण, पहा Best ऑफर्स
REDMI ने Redmi Watch Move स्मार्टवॉचची किंमत 1999 रुपये इतकी निश्चित केली आहे. या स्मार्टवॉचची प्री-बुकिंग भारतात 24 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, जी तुम्ही Flipkart आणि mi.com वरून प्री-ऑर्डर करू शकता. कंपनी या स्मार्टवॉचमध्ये सिल्व्हर स्प्रिंट, ब्लॅक ड्रिफ्ट, ब्लू ब्लेझ आणि गोल्ड रश कलर ऑप्शन्स देणार आहे.
REDMI Watch Move यात 1.85 इंच लांबीचा 2.5D कर्व AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये ऑलवेज-ऑन डिस्प्ले AOD फीचर देखील आहे. याव्यतिरिक्त, ही स्मार्टवॉच HyperOS वर चालते. आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला 200 हून अधिक वॉच फेस पर्याय मिळतील. विशेष म्हणजे या स्मार्टवॉचमध्ये हिंदी भाषेचा सपोर्ट देखील उपलब्ध आहे. स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट उपलब्ध आहे. या रेडमी स्मार्टवॉचमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि स्किन-फ्रेंडली स्ट्रॅप आहे.
कंपनीच्या मते, हे स्मार्टवॉच एकदा चार्ज केल्यानंतर 14 दिवस चालेल. याशिवाय, त्यात क्विक चार्ज सपोर्ट उपलब्ध आहे. यासह 10 मिनिटे चार्जिंग करून तुम्ही ही वॉच 2 ते 3 दिवस सहज वापरू शकता. आरोग्यासाठी, त्यात हार्ट रेट, SpO₂, स्ट्रेस ट्रॅकिंग आणि महिला आरोग्य देखरेख यासारख्या अनेक फीचर्सचा समावेश आहे. फिटनेससाठी, यात 140 हून अधिक वर्कआउट मोड इ. समावेश आहे. पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP68 रेटिंग आहे.