भारीच की ! OnePlus Nord Watch भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 03 Oct 2022
HIGHLIGHTS
  • OnePlus Nord Watch प्रथम भारतात लाँच

  • OnePlus Nord Watch ची किंमत 4,999 रुपये

  • 4 ऑक्टोबरपासून Amazon आणि OnePlus च्या ऑनलाइन स्टोअरमधून खरेदीसाठी उपलब्ध होणार

भारीच की ! OnePlus Nord Watch भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
भारीच की ! OnePlus Nord Watch भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OnePlus ने Nord सिरीजअंतर्गत आपले पहिले स्मार्टवॉच, OnePlus Nord Watch लाँच केले आहे. OnePlus Nord Watch प्रथम भारतात लाँच करण्यात आले आहे. यामध्ये 1.78-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. याशिवाय, OnePlus Nord Watch मध्ये ब्लड ऑक्सिजन ट्रॅकरसह अनेक हेल्थ फीचर्स देण्यात आली आहेत. OnePlus Nord Watch सोबत महिलांच्या मासिक पाळीचे फीचर देखील जोडण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : OTT Web Series October : कॅटपासून ते मिसमॅच 2 पर्यंत, ऑक्टोबरमध्ये रिलीज होणाऱ्या सिरीजची यादी पहा

OnePlus Nord Watch चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

OnePlus Nord Watch मध्ये 1.78-इंच लांबीचा HD AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 368x448 पिक्सेल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे आणि कमाल ब्राइटनेस 500 nits आहे. वॉचच्या उजव्या बाजूला एक बटण देखील दिले आहे. यात SF32LB555V4O6 प्रोसेसर आहे आणि ही वॉच RTOS ने सुसज्ज आहे. 

या वॉचमध्ये इनबिल्ट GPS देखील आहे, जो 3-ऍक्सिस एक्सीलरोमीटरसह येतो. यात स्ट्रेस मॉनिटरिंग आणि SpO2, स्लीप ट्रॅकिंगसह हार्ट रेट ट्रॅकिंग देखील आहे. यासोबत, 105 स्पोर्ट्स मोड देखील तुम्हाला इथे मिळणार आहेत.

वनप्लस नॉर्ड वॉचमध्ये ब्लूटूथ 5.2 आहे आणि ते Android आणि iOS दोन्हीसह वापरले जाऊ शकते. यासोबत 230mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्याचा 10 दिवसांचा बॅकअप असल्याचा दावा करण्यात आला आहे.

OnePlus Nord Watch ची किंमत

OnePlus Nord Watch ची किंमत 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डीप ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल. OnePlus Nord Watch ची विक्री 4 ऑक्टोबरपासून Amazon आणि OnePlus च्या ऑनलाइन स्टोअरमधून सुरू होईल. Axis Bank कार्ड पेमेंटवर 500 रुपयांची सूट मिळेल.

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Tags:
OnePlus Nord Watch price OnePlus Nord Watch price in india OnePlus Nord Watch nord watch OnePlus Nord Watch amazon
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

Titan Neo Analog Dial Men's Watch
Titan Neo Analog Dial Men's Watch
₹ 3995 | $hotDeals->merchant_name
Apple Watch Series 5 (GPS + Cellular, 44mm) - Space Gray Aluminium Case with Black Sport Band
Apple Watch Series 5 (GPS + Cellular, 44mm) - Space Gray Aluminium Case with Black Sport Band
₹ 52900 | $hotDeals->merchant_name
Samsung Galaxy Watch
Samsung Galaxy Watch
₹ 26990 | $hotDeals->merchant_name
Timex Analog Blue Dial Men's Watch-TW00ZR262E
Timex Analog Blue Dial Men's Watch-TW00ZR262E
₹ 1095 | $hotDeals->merchant_name