OTT Web Series October : कॅटपासून ते मिसमॅच 2 पर्यंत, ऑक्टोबरमध्ये रिलीज होणाऱ्या सिरीजची यादी पहा

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 03 Oct 2022
HIGHLIGHTS
  • October मध्ये रिलीज होणाऱ्या वेब सिरीजची यादी बघा

  • ऑक्टोबरमध्ये वेगवेगळ्या जॉनरच्या सिरीज येत आहेत.

  • गुड बॅड गर्ल , मिसमॅच 2 या वेब सिरीज रिलीज होणार आहेत.

OTT Web Series October : कॅटपासून ते मिसमॅच 2 पर्यंत, ऑक्टोबरमध्ये रिलीज होणाऱ्या सिरीजची यादी पहा
OTT Web Series October : कॅटपासून ते मिसमॅच 2 पर्यंत, ऑक्टोबरमध्ये रिलीज होणाऱ्या सिरीजची यादी पहा

ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. या महिन्यात प्रेक्षकांसाठी भरपूर मनोरंजन येणार आहे. काही मजेदार शो आणि सिरीज तुमचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. ऑक्टोबरमध्ये वेगवेगळ्या जॉनरच्या सिरीज येत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना पाहण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. यात रोमान्स, हॉरर, थ्रिलर, ऍक्शन भरलेला आहे. चांगली गोष्ट अशी आहे की, तुम्हाला नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राइम, डिजनी प्लस हॉटस्टार आणि ऍपल टीव्ही प्लस सारख्या प्रत्येक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या सिरीज बघायला मिळतील. चला तर बघुयात या महिन्यात रिलीज होणाऱ्या वेब सिरीजची यादी... 

हे सुद्धा वाचा : Realme युजर्ससाठी मोठी बातमी! ऑक्टोबरपर्यंत सर्व 5G स्मार्टफोन हाय-स्पीड 5G नेटवर्कला करतील सपोर्ट

फील्स लाइक होम सीझन 2

फील्स लाइक होमचा दुसरा सीझन येत आहे. साहिर रझा दिग्दर्शित या सिरीजमध्ये प्रीत कमानी, विष्णू कौशल, मिहिर आहुजा, आयुष्मान मल्होत्रा, हिमिका बोस आणि इनायत सूद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यामध्ये 4 मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. ही सिरीज तुम्ही 7 ऑक्टोबरपासून Lionsgate Play मध्ये पाहू शकता.

आशिकाना सीझन 2 

रोमान्स, थ्रिलर आणि ऍक्शनने बनलेल्या आशिकाना सिरीजचा दुसरा सीझन येत आहे. या शोमध्ये झैन इबाद खान आणि खुशी दुबे मुख्य भूमिकेत आहेत. डिजनी + हॉटस्टारवर ही सिरीज तुम्ही 10 ऑक्टोबरपासून पाहू शकता.

CAT 

रणदीप हुड्डा कॅट या वेब सीरिजमधून OTT मध्ये पदार्पण करत आहे. यामध्ये रणदीप एका शीख व्यक्तीची भूमिका साकारणार आहे जो ड्रग माफियांच्या युद्धात अडकतो. 

मिसमॅच सीझन 2 

प्राजक्ता कोळी, रोहित सराफ आणि रणविजय सिंग स्टारर मिसमॅचचा सीझन 2 येत आहे. गेल्या सीझनमध्ये जिथे प्राजक्ता आणि रोहितची प्रेमकहाणी पाहायला मिळाली होती. त्याचबरोबर या सीझनमध्ये अनेक कपल्स दिसणार आहेत. ही सिरीज तुम्ही 14 ऑक्टोबरपासून Netflix वर पाहू शकता.

गुड बॅड गर्ल 

या शोची कथा मुंबईत राहणाऱ्या माया आहुजावर आधारित आहे. लोकांचे नियम समाजामुळे 7 वर्षाच्या मुलीची संपूर्ण विचारसरणी कशी बदलतात आणि 28 वर्षांनी ती चांगल्या मुलीपासून वाईट मुलगी म्हणून कशी बदलते हे या शोमध्ये दाखवण्यात आले आहे. ही मालिका तुम्ही सोनी लाईव्हवर 14 ऑक्टोबरपासून पाहू शकता.

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Tags:
october ott releases 2022 ott release movies list 2022
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements