ब्लूटूथ कॉलिंग, हार्ट रेटसह Noise ची नवी स्मार्टवॉच लाँच, मिळेल संपूर्ण फिटनेस रिपोर्ट

ब्लूटूथ कॉलिंग, हार्ट रेटसह Noise ची नवी स्मार्टवॉच लाँच, मिळेल संपूर्ण फिटनेस रिपोर्ट
HIGHLIGHTS

Noise X-Fit 2 स्मार्टवॉच भारतात लाँच

स्मार्टवॉच आताच प्रास्ताविक सेलमध्ये 1,999 रुपयांमध्ये खरेदी

ही स्मार्टवॉच तुमच्या फिटनेसचा संपूर्ण अहवाल देईल

Noise X-Fit 2 स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहे. स्मार्टवॉच HRX च्या भागीदारीत बनवलेले आहे, ही वॉच 1.69-इंच लांबीच्या TFT डिस्प्लेसह येते आणि त्यात SpO2 आणि स्लीप मॉनिटर्ससह अनेक आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकर्स आहेत. X-Fit 2 मध्ये 150 वॉच फेस आणि अलार्म, फाईंड माय फोन आणि वेदर फोरकास्ट  यासारखे स्मार्ट फीचर्स आहेत. कंपनी वियरेबलसाठी 7 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ आणि 30 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइमचा दावा करते. 

हे सुद्धा वाचा : Uber ने दिली मोठी सुविधा, आता WhatsApp वरून कॅब बुक करता येणार, जाणून घ्या कसे ?

Noise X-Fit 2 चे स्पेसिफिकेशन्स 

Noise's X-Fit 2 मध्ये 1.69-इंच लांबीचा TFT LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 240×280 पिक्सेल आहे. वॉचमध्ये 60 स्पोर्ट्स मोड आहेत आणि अनेक आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंग फिचर्ससह नॉइज हेल्थ सूटसह येते. स्मार्टवॉचमध्ये एक्सीलरोमीटर, ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 यासह सेन्सर आहेत.

Noise X-Fit 2 द्वारे ट्रॅक केलेल्या इतर फिटनेस फीचर्समध्ये कॅलरी बर्न, स्लीप मॉनिटर आणि स्टेप ट्रॅकर यांचा समावेश होतो. स्मार्टवॉचमध्ये अलार्म, कॅलेंडर रिमाइंडर, कॉल आणि SMS रिप्लाय, फाईंड माय फोन, रिमोट म्युझिक कंट्रोल, टाइमर आणि वेक जेश्चर यासारखे स्मार्ट फीचर्स आहेत.

हे सुद्धा वाचा : Amazon Great Freedom Festival Sale 2022 सुरु, 'या' टॉप स्मार्टफोन्सवर मिळतायेत सर्वोत्तम डिल्स

Noise X-Fit 2 ची भारतात किंमत

Noise X-Fit 2 ची किंमत 3,999 रुपये आहे. पण तुम्ही ते आत्ताच प्रास्ताविक सेलमध्ये 1,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. X-Fit 2 जेट ब्लॅक, सिल्व्हर ग्रे आणि स्पेस ब्लू या तीन कलर व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली  आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo