SIM कार्ड, कॅमेरा, कॉलिंगसह Noise ची स्वस्त स्मार्टवॉच, मोबाईल फोनची गरज संपली ?

HIGHLIGHTS

सिम कार्डसह Noise GT 08 स्मार्टवॉच सादर

ही कंपनीची स्वस्त स्मार्टवॉच आहे, असे सांगण्यात येत आहे.

यामध्ये तुम्हाला कॅमेरा, कॉलिंग आणि बरेच हेल्थ फीचर्स मिळतील.

SIM कार्ड, कॅमेरा, कॉलिंगसह Noise ची स्वस्त स्मार्टवॉच, मोबाईल फोनची गरज संपली ?

Noiseने एक खास स्मार्टवॉच Noise GT 08 सादर केले आहे. हे एक खास प्रकारचे स्मार्टवॉच आहे. ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही स्मार्टफोनची गरज नाही. या स्मार्टवॉचमध्ये सिमकार्ड बसवता येते. यासोबतच वॉचमध्ये कॅमेरा आणि कॉलिंगसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्याच्या काळातील बहुतांश स्मार्टवॉचेसना कॉलिंग आणि कॅमेरासाठी स्मार्टफोनची कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे. पण Noise GT 08 हे एक स्वतंत्र स्मार्टवॉच आहे, जे उत्तम फीचर्स देते. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Jio 5G वापरण्यापूर्वी 'या' महत्त्वाच्या गोष्टी करा! मोफत चालेल सुपरफास्ट इंटरनेट \

विशेष फीचर्स : 

Noise GT 08 स्मार्टवॉचमध्ये 1.54 इंच HD TFT LCD डिस्प्ले आहे. त्याचा डायल स्टेनलेस स्टील बॉडीमध्ये येतो. वॉच Android कनेक्टिव्हिटीसह येते. यामध्ये ब्लूटूथ 3.0 कनेक्टिव्हिटी दिली जाईल. वॉचमध्ये कॉलिंग आणि कॉल सिंक सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, रिमोट कॅमेरा, नोटिफिकेशन पुश सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

वॉचमध्ये 2G कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. याशिवाय स्मार्टवॉचमध्ये 1.3M बिल्ड-इन कॅमेरा, बिल्ड इन माइक, स्पीकर देण्यात आले आहेत. डिवाइसमध्ये 128M रॅम आणि 64MB ROM सपोर्ट आहे. यात 350mAh लिथियम आयन बॅटरी सपोर्ट आहे. त्याची स्टँडबाय बॅटरी लाईफ सुमारे 100 ते 120 तास आहे. 

त्याबरोबरच, यामध्ये पेडोमीटर, स्लीप मॉनिटर, स्लीप आणि स्ट्रेस मॉनिटर यासारखे फिटनेस फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय कॅलरी बर्न, स्लीपिंग कंडिशन, वॉच, कॅलेंडर, स्टॉपवॉच, कॅल्क्युलेटर, म्युझिक प्लेइंग आणि रिमोट कॅप्चर फीचर देण्यात आले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo