Jio 5G वापरण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी करा! मोफत चालेल सुपरफास्ट इंटरनेट

Jio 5G वापरण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी करा! मोफत चालेल सुपरफास्ट इंटरनेट
HIGHLIGHTS

Jio 5G वापरण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी

Airtel वापरकर्त्यांकडे स्वतःच सुरु होईल 5G इंटरनेट

Airtel आणि Jio 5G सहज वापरता येतात.

जर तुम्ही Jio 5G वापरण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असायला हवे. कारण अनेक वेळा 5G स्मार्टफोन असूनही तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क काम करत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. वाचा सविस्तर

हे सुद्धा वाचा : Apple Watch Ultra प्रमाणे लुकसह नवीन Gizmore स्मार्टवॉच लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहे किंमत

Jio 5G वापरण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी 

My Jio ऍपच्या मदतीने तुम्ही फोनमध्ये 5G नेटवर्क सक्षम करू शकता. ज्या वापरकर्त्यांना ही सुविधा दिली जात आहे, त्यांना ऍपमध्ये नोटिफिकेशन मिळेल. तुम्ही या नोटिफिकेशनवर क्लिक करताच ऍपला तुमच्या फोनचा डेटा मिळेल आणि तुम्ही फोनमध्ये 5G नेटवर्कचा फायदा कसा घ्यावा याची सूचना देखील मिळेल. यासोबतच ऍपमध्ये अनेक शॉर्टकटही उपलब्ध आहेत, त्यावर क्लिक करताच फोनची सेटिंग ओपन होईल. 

येथे सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 5G नेटवर्क सपोर्ट देखील पाहावा लागेल. जर ते अनेबल केले असेल आणि तरीही तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क येत नसेल, तर तुम्हाला फोन एकदा रीस्टार्ट करावा लागेल. रीस्टार्ट केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट सेवा सुरू होईल. यानंतर तुम्ही फास्ट इंटरनेटचा लाभ घेऊ शकता.

Airtel वापरकर्त्यांकडे स्वतःच सुरु होईल 5G इंटरनेट 

Airtel ने सुद्धा 5G नेटवर्क सुरू केले आहे. यामध्ये तुम्ही 5G नेटवर्क सक्षम करू शकता. मात्र, ज्या उपकरणांना 5G नेटवर्क सपोर्ट मिळत आहे, त्यामध्ये इंटरनेट स्वतःच चालू होईल. तसेच, ते सुरू करण्यासाठी तुम्ही एअरटेल ऍपमध्ये सेटिंग्ज देखील करू शकता. येथे तुम्हाला नोटिफिकेशन देखील मिळेल. म्हणजेच Airtel आणि Jio 5G सहज वापरता येतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo