Noise चे GPS-सक्षम स्वस्त स्मार्टवॉच लाँच, किंमत 3,000 रुपयांपेक्षा कमी…

Noise चे GPS-सक्षम स्वस्त स्मार्टवॉच लाँच, किंमत 3,000 रुपयांपेक्षा कमी…
HIGHLIGHTS

Noise ColorFit Pro 4 GPS नवीन स्मार्टवॉच लाँच

Noise ColorFit Pro 4 GPS ची किंमत 2,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

AMAZON आणि कंपनीच्या साइटवरून स्मार्टवॉचची विक्री सुरू

देशांतर्गत कंपनी Noiseने आपले नवीन स्मार्टवॉच Noise ColorFit Pro 4 GPS भारतात लाँच केले आहे. नावाप्रमाणेच या वॉचमध्ये इनबिल्ट GPS आहे. याशिवाय यात कलरफुल डिस्प्ले आणि ब्लूटूथ कॉलिंग उपलब्ध असेल. या सिरीजमध्ये आधीच Noise ColorFit Pro 4, ColorFit Pro 4 Max आणि ColorFit Pro 4 Alpha समाविष्ट आहे.

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! Apple iPhone 14 सर्वात स्वस्त खरेदी करण्याची उत्तम संधी, जाणून घ्या ऑफर

Noise ColorFit Pro 4 GPS चे स्पेसिफिकेशन्स 

Noise ColorFit Pro 4 GPS मध्ये 240×284 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 600 nits च्या ब्राइटनेससह 1.85-इंच लांबीचा TFT डिस्प्ले आहे. या वॉचसोबत 22 मिमीचा सिलिकॉन स्ट्रॅप उपलब्ध असेल. स्ट्रॅपसह प्रदान केलेला GPS चालणे, धावणे, अंतर प्रवास इत्यादी दैनंदिन क्रियाकलाप ट्रॅकिंगसाठी वापरता येईल. 

हेल्थ फीचर्समध्ये यात हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन SpO2 ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग आणि पीरियड ट्रॅकर मिळेल. यामध्ये श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि तणाव व्यवस्थापन देखील उपलब्ध असेल. वॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड उपलब्ध असतील. तसेच, यात ब्लूटूथ कॉलिंग देखील उपलब्ध आहे. यामध्ये 250mAh बॅटरी सपोर्ट आहे, ज्याचा 7 दिवसांचा बॅकअप देण्याचा दावा केला जातो. वॉटर रेझिस्टन्ससाठी डिवाइसला IP68 रेटिंग मिळाली आहे.

Noise ColorFit Pro 4 GPS किंमत

Noise ColorFit Pro 4 GPS ची किंमत 2,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही वॉच जेट ब्लॅक, कॉपर ब्राउन, गोल्ड वाइन, ऍक्टिव्ह ब्लू आणि शॅडो ब्लॅक रंगांमध्ये खरेदी करता येईल. AMAZON आणि कंपनीच्या साइटवरून स्मार्टवॉचची विक्री सुरू झाली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo