त्वरा करा ! Apple iPhone 14 सर्वात स्वस्त खरेदी करण्याची उत्तम संधी, जाणून घ्या ऑफर

त्वरा करा ! Apple iPhone 14 सर्वात स्वस्त खरेदी करण्याची उत्तम संधी, जाणून घ्या ऑफर
HIGHLIGHTS

फ्लिपकार्टवर Flipkart Big Saving Day सेल सुरू

iPhone 14 वर भारी सूट उपलब्ध

ऑफरसह तुम्हाला तब्बल 35,000 रुपयांपर्यंत बचत करता येईल.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर Flipkart Big Saving Day सेल सुरू झाला आहे. Flipkart चा हा सेल 15 ते 20 जानेवारी 2023 पर्यंत चालणार आहे. Flipkart Apple च्या नवीनतम फोन, iPhone 14 वर उत्तम सूट देत आहे. आयफोन 14 पहिल्यांदाच इतक्या कमी किमतीत लिस्ट करण्यात आला आहे. जर तुम्हाला आयफोन 14 चे वेड असेल तर हा फोन खरेदी करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. 

iPhone 14 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर त्याची किंमत 66,999 रुपये आहे. या किमतीत, iPhone 14 चे वेरिएंट 128 GB स्टोरेजसह येते. म्हणजेच तुम्हाला पहिल्यांदाच इतक्या कमी किमतीत iPhone 14 खरेदी करण्याची संधी मिळत आहे. सर्व ऑफर्ससह, 79,900 रुपये किमतीचा हा फोन 45,990 रुपयांना खरेदी करता येईल.

हे सुद्धा वाचा : Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल सर्व सदस्यांसाठी सुरू, पहा बेस्ट डील्स

ऑफर्स : 

iPhone 14 128 GB, 256 GB आणि 512 GB अशा तीन व्हेरिएंटमध्ये येतो आणि तिन्ही व्हेरिएंट सध्या फ्लिपकार्टवर सवलतीसह उपलब्ध आहेत. iPhone 14 चा 128 GB स्टोरेज व्हेरिएंट 66,999 रुपयांना, 256 GB स्टोरेज व्हेरिएंट 76,999 रुपयांना आणि 512 GB स्टोरेज व्हेरिएंट 96,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. एवढेच नाही तर Citi क्रेडिट, ICICI बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांसह फोनवर 10% सूट देखील उपलब्ध आहे.

त्याबरोबरच, iPhone 14 वर Flipkart Axis Bank कार्डवर 5% कॅशबॅक आणि नो कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. तर, iPhone 14 वर 20,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. म्हणजेच जुना फोनची एक्सचेंज करून तुम्ही जास्त बचत करू शकता.

iPhone 14 स्पेसिफिकेशन आणि फीचर्स : 

iPhone 14 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. डिस्प्लेसह, 1,200 निट्स पीक ब्राइटनेस आणि ऑल्वेज ऑन डिस्प्लेसाठी सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. iPhone 14 मध्ये A15 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 5 कोर GPU सह येतो. iPhone 14 मध्ये 12-megapixel रियर कॅमेरा सेटअप आणि 12-megapixel फ्रंट कॅमेरा आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo