प्रसिद्ध टेक दिग्गज Itel ने भारतीय बाजारात एक नवीन स्मार्टवॉच Itel Alpha 2 Pro लाँच केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही स्मार्टवॉच गेल्या वर्षी लाँच झालेल्या Alpha Pro चे अपग्रेड आहे. लक्षात घ्या की, ही स्मार्टवॉच अशा वापरकर्त्यांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. ज्यांना एकाच पॅकेजमध्ये टिकाऊपणा आणि स्मार्ट फीचर्स हवी आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Itel Alpha 2 Pro ची किंमत आणि सर्व तपशील-
itel Alpha 2 Pro ची किंमत 2,199 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही स्मार्टवॉच भारतीय बाजारपेठेतील रिटेल आउटलेटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. लक्षात घ्या की, ही वॉच तुम्ही मिडनाईट ब्लू, कॉपर गोल्ड आणि डार्क क्रोम कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
itel Alpha 2 Pro आवश्यक स्मार्ट फंक्शन्सना समर्थन देते, जे प्रवासासाठी स्मार्टवॉचला सर्वोत्तम बनवते. तसेच, धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी ही वॉच IP68 रेटिंगसह सुसज्ज आहे.
itel Alpha 2 Pro चे फीचर्स आणि स्पेक्स
itel Alpha 2 Pro मध्ये 1.96 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये 500nits ची कमाल ब्राइटनेस आहे, ज्यामुळे तेजस्वी सूर्यप्रकाशातही स्पष्ट दृश्यमानता मिळेल. या स्मार्टवॉचमध्ये ऑल्वेज ऑन डिस्प्लेचा समर्थन मिळेल. उत्कृष्ट लूकसाठी प्रीमियम मेटॅलिक फ्रेमसह सुसज्ज आहे. त्याबरोबरच, या स्मार्टवॉचमध्ये 100 स्पोर्ट्स मोड्स आहेत, जे वेगवेगळ्या वर्कआउट रूटीनना समर्थन देतात.
याव्यतिरिक्त, या स्मार्टवॉचचा लूक पर्सनलाइज्ड करण्यासाठी यामध्ये 150 हून अधिक वॉच फेस देखील उपलब्ध आहेत. तसेच, पॉवर बॅकअपसाठी, यात 300mAh बॅटरी आहे, जी एकदा चार्ज केल्यावर 12 ते 15 दिवसांचा स्टँडबाय टाइम देते. ही स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंगसाठी सिंगल-चिप सोल्यूशनने सुसज्ज आहे. तसेच कॉल अलर्ट, अलीकडील कॉल हिस्टरी ऍक्सेस आणि जलद संप्रेषणासाठी त्यात बिल्ट-इन डायल पॅड देखील आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile