HUAWEI Watch Fit 3: HUAWEI Watch Fit 3 स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहे. ही कंपनीची एक प्रीमियम स्मार्टवॉच आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, या वॉचमध्ये HUAWEI स्मार्ट सजेशन्स फीचर आहे, जे तुमच्या वैयक्तिक सवयी, कॅलरीजचे सेवन आणि हवामानानुसार तुम्हाला वर्कआउट्स सुचवते. त्यात ऍल्युमिनियम चेसिस आहे. त्याबरोबरच, यामध्ये हेल्थ आणि स्पोर्ट्स मोड सारखे स्मार्ट फीचर्स देखील आहेत. जाणून घेऊयात किंमत आणि फीचर्स-
Also Read: तारीख नोट करा! CMF Phone 2 Pro ची भारतीय लाँच डेट जाहीर, नव्या जबरदस्त स्मार्टफोनसाठी व्हा सज्ज
HUAWEI Watch Fit 3 कंपनीने 14,999 रुपयांना निश्चित करण्यात आला आहे. तसेच, स्पेस ग्रे कलर विथ नायलॉन स्ट्रॅप पर्यायाची किंमत 15,999 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही हे स्मार्टवॉच Amazon, Flipkart आणि RTC च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकाल. तसेच, तुम्ही ही वॉच Amazon वर 10,999 रुपयांना खरेदी करू शकता. ही वॉच मिडनाईट ब्लॅक, नेब्युला पिंक, मून व्हाइट आणि ग्रीन कलर ऑप्शन्स मध्ये उपलब्ध आहे.
HUAWEI Watch Fit 3 मध्ये 1.82-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये बिल्ट-इन GPS सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, ट्रॅक रन मोड आणि मॅप रनिंग रूट्स सारखी फीचर्स देखील त्यात आहेत. विशेष म्हणजे या स्मार्टवॉचमध्ये Huawei चे स्मार्ट सजेशन्स फिचर आहे, जे तुमच्या सवयी, कॅलरी कंजप्शन आणि हवामानानुसार तुम्हाला वर्कआऊट करण्याचा सल्ला देते.
याव्यतिरिक्त, आरोग्य निरीक्षणासाठी यात 9-अक्षीय IMU सेन्सर (अॅक्सिलरोमीटर सेन्सर, जायरोस्कोप सेन्सर, मॅग्नेटोमीटर सेन्सर) आहे. ही स्मार्टवॉच हार्ट रेटवर देखील लक्ष ठेवते. तसेच, पाण्यापासून संरक्षणासाठी या स्मार्टवॉचला 5 ATM चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये बॅटरी 400mAh बॅटरी मिळेल, जी एकदा चार्ज केल्यानंतर 10 दिवस चालेल. ही स्मार्टवॉच चार्जिंगशिवाय 7 दिवसांपर्यंत वापरली जाऊ शकते.