HIGHLIGHTS
Gizmoreकडून नवीन स्मार्टवॉच Gizfit Ultra लाँच
लाँच ऑफर अंतर्गत स्मार्टवॉचची किमंत 1,799 रुपये
ही स्मार्टवॉच इ- कॉमर्स वेबसाईट Flipkart वर उपलब्ध
भारतीय कंपनी Gizmore ने वापरकर्त्यांसाठी बजेट सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टवॉच Gizfit Ultra आणले आहे. लाँच ऑफर अंतर्गत, कंपनी हे घड्याळ 1,799 रुपयांना विकत घेण्याची संधी देत आहे. ऑफरनंतर या स्मार्टवॉचची किंमत 2,699 रुपये असेल. Gizfit Ultra ची विक्री सुरू झाली आहे. तुम्ही हे स्मार्टवॉच Flipkart वरून ग्रे, बरगंडी आणि काळ्या कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकता. या स्मार्टवॉचमध्ये अनेक महत्त्वाचे आरोग्य आणि फिटनेस मोड देण्यात आले आहेत.
Surveyहे सुद्धा वाचा : Oneplus 9 Pro 5g स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल 19,000 रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर
Gizmore च्या या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला 240×280 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.69 इंच 2.5D HD कर्व IPS LCD मिळेल. फुल टच कंट्रोलसह या स्मार्टवॉचची मॅक्सिमम ब्राइटनेस लेव्हल 500 nits आहे. विशेष बाब म्हणजे कंपनी या डिस्प्लेमध्ये इंटेलिजेंट स्प्लिट स्क्रीन फीचर देखील देत आहे.
हे स्मार्टवॉच वापरकर्त्यांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेते. यासाठी 24×7 हार्ट रेट सेन्सर व्यतिरिक्त यामध्ये SpO2 आणि स्लीप मॉनिटर देखील देण्यात आला आहे. तुम्हाला यामध्ये 60 पेक्षा जास्त फिटनेस मोड देखील आढळतील. यात 100 पेक्षा जास्त वॉच फेस देखील आहेत. गेमिंगची आवड असलेल्या युजर्ससाठी यामध्ये तीन इन-बिल्ट गेमही देण्यात आले आहेत.
IP68 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट रेटिंग असलेल्या या स्मार्टवॉचची बॅटरी सिंगल चार्जवर 15 दिवसांपर्यंत टिकेल, अशी माहिती मिळाली आहे. यामध्ये तुम्हाला अलेक्सा आणि सिरीचा सपोर्टही मिळेल. याच्या मदतीने तुम्ही म्युझिक कंट्रोल करू शकता तसेच ब्लूटूथ कॉलिंग करू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी या वॉचमध्ये ब्लूटूथ 5.0 देत आहे. ही वॉच अँड्रॉइड आणि IOS उपकरणांसह पेयर करता येते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile