Oneplus 9 Pro 5g स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल 19,000 रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर

Oneplus 9 Pro 5g स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल 19,000 रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर
HIGHLIGHTS

Oneplus 9 Pro 5g वर मिळतेय प्रचंड सवलत

ऑफर Amazon The Great India Freedom Sale दरम्यान उपलब्ध

स्मार्टफोन वर तब्बल 19,000 रुपयांची सूट उपलब्ध

Oneplus 9 Pro 5g  स्मार्टफोनवर ऑफर Amazon The Great India Freedom Sale दरम्यान उपलब्ध आहे. जिथे फोन सर्वात कमी किमतीत मिळू शकतो. या OnePlus फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर पाहायला मिळेल. यासोबतच 48 एमपी हॅसल ब्लड कॅमेरा आणि 12 जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे. Oneplus 9 Pro सध्या त्याच्या लाँच किमतीवरून 15,000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. 

हे सुद्धा वाचा : खुशखबर ! Tata Play ने लाँच केला अतिशय स्वस्त प्लॅन, 249 रुपयांमध्ये 203 चॅनेल गिफ्ट

Oneplus 9 Pro 5g

 कंपनीने 6.7-इंच स्क्रीनसह Oneplus 9 Pro सादर केला आहे. हा फोन डिस्प्लेसाठी LTPO टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो आणि तुम्हाला त्यात Fluid AMOLED पॅनल दिसेल. तसेच, फोन 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह HDR 10 Plus ला देखील समर्थन देतो. फोनच्या स्क्रीनवर तुम्हाला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन मिळेल.

हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटवर चालतो, जो 2.84GHz पर्यंत मॅक्सिमम क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. तसेच यात, तुम्हाला 8GB आणि 12GB RAM मेमरी मिळते आणि स्टोरेजसाठी 128GB आणि 256GB पर्याय उपलब्ध आहेत.

Oneplus 9 Pro वरील ऑफर

Oneplus 9 Pro हा फोन कंपनीने 64,999 रुपयांना लाँच केला होता. पण सध्या हे ऑनलाइन स्टोअर Amazon India वर 15,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 49,999 रुपयांना उपलब्ध आहे. यासोबतच कंपनी SBI क्रेडिट कार्डवर 4,250 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही हा फोन फक्त 45,749 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. 

याशिवाय, Amazon Pay आणि ICICI कार्ड पेमेंट सारख्या इतर अनेक ऑफर आहेत. तसेच, EMI वर 1,250 रुपयांची सूट दिली जात आहे. पण सर्वात मोठी ऑफर फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डवर दिली जात आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo