खुशखबर ! Tata Play ने लाँच केला अतिशय स्वस्त प्लॅन, 249 रुपयांमध्ये 203 चॅनेल गिफ्ट

खुशखबर ! Tata Play ने लाँच केला अतिशय स्वस्त प्लॅन, 249 रुपयांमध्ये 203 चॅनेल गिफ्ट
HIGHLIGHTS

Tata Play ने 'हिंदी महाबचत पॅक' लाँच केला

यामध्ये ग्राहकांना 249 रुपयांमध्ये 203 चॅनेल्सचे गिफ्ट मिळणार

15 ऑगस्टच्या निमित्ताने ग्राहकांसाठी एक खास भेट

Tata Play ने 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या ग्राहकांना एक खास भेट दिली आहे. टाटा प्लेने एक नवीन प्लॅन  सादर केला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 249 रुपयांमध्ये स्टार, सोनी, कलर्स आणि झी सोबत 203 इतर चॅनेल पाहण्याची संधी मिळेल.

हे सुद्धा वाचा : 'भुज'पासून ते 'डार्लिंग्स'पर्यंत OTT वर कितीमध्ये विकले 'हे' बॉलिवूड चित्रपट? कार्तिक आर्यनने केला 'धमाका'

हिंदी महाबचत पॅक

टाटा प्ले ने या प्लॅनला 'हिंदी महाबचत पॅक' असे नाव दिले आहे. या अंतर्गत ग्राहकांना स्टार प्लस, सेट, कलर्स, झी टीव्ही, स्टार गोल्ड, सोनी मॅक्स, झी सिनेमा, कलर्स सिनेप्लेक्स, आज तक, एनडीटीव्ही आणि इतर 203 चॅनेल फक्त 249 रुपयांमध्ये मिळतील.

या महाबचत पॅकबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, टाटा प्लेने एक जाहिरात देखील आणली आहे. ज्यामध्ये हिंदी भाषिक बाजारपेठांमध्ये करीना कपूर आणि सैफ अली खान आणि दक्षिण भारतातील माधवन आणि प्रियामणी हे दिसतील.

हा नवीन पॅक भारतातील सर्व विद्यमान आणि नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ग्राहक त्यांच्या जवळच्या टाटा प्ले विक्रेत्याला भेट देऊन किंवा www.Tataplay.com या वेबसाइटवरून नवीन उत्कृष्ट बचत पॅकचा लाभ घेऊ शकतात. विद्यमान सदस्यांना टाटा प्लेच्या मोबाइल ऍपमध्ये नवीन पॅकमध्ये 'महाबचत वाले पॅक' पर्याय देखील मिळेल.

नवीन योजनेच्या लाँचबद्दल बोलताना टाटा प्लेचे MD आणि CEO हरित नागपाल म्हणाले, ''मनोरंजन ही माणसाची मूलभूत गरज आहे. मात्र, वाढत्या किमतींमुळे, लोक अन्न आणि इंधन आणि मनोरंजन खर्च यासारख्या मूलभूत गरजांसाठी नाइलाजाने पैसे खर्च करतात. त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या मनोरंजन कार्यक्रमाचे वितरक या नात्याने मनोरंजन लोक्कां परवडणारे बनवण्याची जबाबदारी आमची आहे.''

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo