Garmin कडून जबरदस्त सोलर स्मार्टवॉच लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स, वाचा डिटेल्स

Garmin कडून जबरदस्त सोलर स्मार्टवॉच लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स, वाचा डिटेल्स
HIGHLIGHTS

Garminकडून Forerunner 955 आणि Forerunner 255 स्मार्टवॉच सिरीज भारतीय बाजारात लाँच

कंपनीने दोन सिरीजमध्ये 6 स्मार्टवॉचेस लाँच केली आहेत

स्मार्टवॉचेस सोलर व्हेरिएंटमध्ये देखील उपलब्ध

स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकिंग डिव्हाइस ब्रँड Garmin ने आपले नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. कंपनीने Forerunner 955 आणि Forerunner 255 सिरीज भारतीय बाजारात लाँच केली आहे. दोन्ही सिरीजमध्ये एकूण 6 स्मार्टवॉचेस आहेत. दोन्ही सिरीजमधील स्मार्टवॉच इनबिल्ट GPS सह येतात. हे उपकरण रनिंग करणाऱ्यांसाठी आणि खेळाडूंसाठी डिझाईन करण्यात आले आहे. चला  तर मग जाणून घेऊयात या स्मार्टवॉचेसची किंमत आणि फीचर्स… 

हे सुद्धा वाचा : खुशखबर ! Samsung च्या 'या' आकर्षक कॅमेरा स्मार्टफोनची किंमत झाली 10,000 रुपयांनी कमी

किंमत : 

Garmin Forerunner 955 मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, त्याची सुरुवातीची किंमत 53,490 रुपये आहे. तसेच, त्याच्या सोलर व्हेरिएंटची किंमत 63,990 रुपये आहे. तर Forerunner 255 सिरीज 37,490 रुपयांपासून सुरू होते. या सिरीजमधील टॉप व्हेरिएंट म्हणजेच Forerunner 255S Music ची किंमत 42,990 रुपये आहे. तुम्ही या सर्व स्मार्टवॉच  Garmin च्या अधिकृत स्टोअर, Croma, Flipkart आणि Amazon वरून खरेदी करू शकता. 

Garmin Forerunner 955 चे फीचर्स 

ब्रँडने हे स्मार्टवॉच दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. तुम्ही ते सोलर आणि नॉन-सोलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता. सोलर व्हर्जन पॉवर ग्लास सोलर चार्जिंग लेन्ससह येतो. यामध्ये यूजर्सना 20 दिवसांची बॅटरी लाइफ मिळते.

तसेच, तुम्हाला वॉचमध्ये इन-बिल्ट GSP ची सुविधा मिळते. यात 1.3-इंच लांबीचा ऑल्वेज ऑन डिस्प्ले आहे. हा फुल कलर टचस्क्रीन डिस्प्ले आहे. यामध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, रेंज व्हिजिट, ट्रेनिंग रेडिनेस स्कोअर यांसारखे फीचर्स उपलब्ध आहेत.

Garmin Forerunner 255

या सिरीजमध्ये तुम्हाला एक म्युझिक एडिशनही मिळेल.कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे वॉच सिंगल चार्जमध्ये 14 दिवस वापरले जाऊ शकते. तसेच, GPS मोडमध्ये वापरकर्त्यांना 30 तासांची बॅटरी लाइफ मिळेल. स्मार्टवॉचमध्ये तुम्ही 500 गाणी स्टोअर करू शकता. यावर तुम्हाला Spotify आणि Amazon Music चा ऍक्सेस मिळेल. तुम्ही वॉचला ब्लूटूथ इयरबड कनेक्ट करून गाणे ऐकू शकता. यामध्येही कंपनीने 1.3 इंच टच स्क्रीन डिस्प्ले दिला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo