खुशखबर ! Samsung च्या ‘या’ आकर्षक कॅमेरा स्मार्टफोनची किंमत झाली 10,000 रुपयांनी कमी

खुशखबर ! Samsung च्या ‘या’ आकर्षक कॅमेरा स्मार्टफोनची किंमत झाली 10,000 रुपयांनी कमी
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन 10,000 रुपयांनी स्वस्त

हा फोन Amazon, Reliance Digitalसह अनेक ई-कॉमर्स वेबसाइटवर मोठ्या सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध

स्मार्टफोन Amazon वर 20,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध

Samsung Galaxy M52 5G हा एक मिड रेंज Android स्मार्टफोन आहे, जो 2021 च्या उत्तरार्धात भारतात लाँच झाला होता. हा फोन त्यावेळी 29,999 रुपयांना सादर करण्यात आला होता. आता या स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे. हा फोन Amazon, Reliance Digital इत्यादींसह अनेक ई-कॉमर्स वेबसाइटवर मोठ्या सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामुळे बँक आणि एक्सचेंज ऑफरनंतर किंमत आणखी कमी होईल. चला तर जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती… 

हे सुद्धा वाचा : JIOचे परवडणारे प्लॅन्स ! दररोज डेटा, अमर्यादित कॉल आणि मोफत OTT लाभ, किंमत 119 रुपयांपासून सुरू

Samsung Galaxy M52 5G च्या किमतीत कपात

Samsung Galaxy M52 5G Amazon वर 20,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा फोन 29,999 रुपयांना लॉन्च केला गेला. म्हणजेच या फोनवर तुम्हाला 9,000 रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय, SBI कार्डधारकांना 10 टक्के सूट मिळेल.

तुम्हाला Citibank क्रेडिट आणि डेबिट कार्डसह 3,000 रुपयांच्या झटपट सवलतीवर Reliance Digital वर Samsung Galaxy M52 5G खरेदी करता येईल. दुसरीकडे, तुम्हाला इंडसइंड बँक क्रेडिट EMI व्यवहारांवर 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. 

Samsung Galaxy M52 5G चे फीचर्स 

फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा फुल-HD सुपर AMOLED डिस्प्ले आहे. M52 5G मध्ये 5000mAh बॅटरी आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटसह येतो. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12MP वाइड-एंगल आणि 5MP मॅक्रो लेन्ससह 64MP प्रायमरी कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo