samsung galaxy ring price drop
साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक जायंट Samsung ने Samsung Galaxy Ring मागील वर्षी म्हणेजच जुलै 2024 मध्ये सादर केली होती. ही रिंग सॅमसंगच्या नवीनतम फोल्डेबल स्मार्टफोन्ससह लाँच करण्यात आली होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात ही रिंग 38,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आली होती. जी नक्कीच एक महागडी स्मार्ट रिंग आहे. सध्या या स्मार्ट रिंगच्या किमतीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.
Also Read: फक्त 20,000 रुपयांअंतर्गत मिळतायेत 43 इंच लांबीचे Smart TV, स्वस्तात मिळेल थिएटरची मज्जा!
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या स्मार्ट रिंगचा मुख्य वापर तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येईल. ही रिंग एक ऍक्सेसरी म्हणून वापरली जाऊ शकते. नक्कीच हे उपकरण कॅरी करण्यास सोपे आहे आणि या डिवाइसची बॅटरी लाइफ देखील दीर्घकाळापर्यंत टिकणारी आहे. दरम्यान, Samsung या स्मार्ट रिंगवर आता 10,000 रुपयांची सूट देत आहे, जी कूपन कोडद्वारे मिळवता येते.
वर सांगितल्याप्रमाणे, भारतात Samsung Galaxy Ring मागील वर्षी 38,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आली होती. ही रिंग 10,000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करता येईल. यासाठी तुम्हाला प्रथम Samsung च्या ऑनलाइन स्टोअरवर जावे लागेल आणि तेथे ‘Galaxy Ring’ सर्च करा. नंतर रिंगचा साईज आणि करत सिलेक्ट करा. यानंतर तुम्हाला डिस्काउंटसाठी व्हाउचर किंवा कूपन कोड टाकण्याचा पर्याय मिळेल.
त्यानंतर, तिथेच ‘गॅलेक्सी रिंग’ कूपन वापरून यावर थेट 10,000 रुपयांची सूट मिळवता येईल. या सवलतीसह तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी रिंग 28,999 रुपयांच्या सवलतीच्या किमतीत खरेदी करू शकता. अधिक माहितीसाठी सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाईन स्टोअरला भेट द्या.
Samsung Galaxy Ring च्या मुख्य तपशिलांबद्दल बोलायचे झाल्यास, ही स्मार्ट रिंग ब्रँडची ऍडव्हान्स सेन्सर टेक्नॉलॉजीची स्टायलिश, कॉम्पॅक्ट डिझाइन रिंग आहे. या रिंग टायटॅनियम ग्रेड 5 फिनिशसह 10ATM पाणी प्रतिरोधक आहे. ही स्मार्ट रिंग तुम्हाला स्लीप ऍनालिसिस, हार्ट रेट अलर्ट आणि पर्सनलाइज्ड वेलनेस टिप्स यासारख्या फीचर्ससह सतत आरोग्य निरीक्षण देते. आता त्याच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला एकाच चार्जवर सात दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ मिळेल.