आकर्षक boAt Wave Sigma 3 स्मार्टवॉच भारतात लाँच! तब्बल 7 दिवसांपर्यंत टिकेल बॅटरी, किंमतही कमी। Tech News

Updated on 23-May-2024
HIGHLIGHTS

boAt कंपनीने देशात नवीन स्मार्टवॉच boAt Wave Sigma 3 लाँच केले आहे.

boAt Wave Sigma 3 ची किंमत 1,199 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

boAt Wave Sigma 3 स्मार्टवॉचमध्ये एक DIY वॉच फेस स्टुडिओ आहे.

वेअरेबल्ससाठी प्रसिद्ध boAt कंपनीने देशात नवीन स्मार्टवॉच boAt Wave Sigma 3 लाँच केले आहे. ही नवी स्मार्टवॉच 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्मार्टवॉचमध्ये मोठा डिस्प्ले आणि मॅप नेव्हिगेशन सिस्टम आहे. त्याबरोबरच, ही वॉच 7 दिवसांपर्यंत टिकणाऱ्या बॅटरीसह येईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता Wave Sigma 3 ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा: Tips: नवीन Smartwatch खरेदी करायची आहे? या ‘5’ महत्त्वाच्या गोष्टी नक्की चेक करा, बघा डिटेल्स। Tech News

boAt Wave Sigma 3 ची किंमत

boAt Wave Sigma 3 ची किंमत 1,199 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही वॉच ऍक्टिव्ह ब्लॅक, मेटल ब्लॅक, मेटल ग्रे, कूल ग्रे, चेरी ब्लॉसम, रस्टिक रोझ आणि सॅफायर ब्रीझ कलर ऑप्शन्ससह सादर केली गेली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, ही स्मार्टवॉच ब्रँडच्या अधिकृत वेबसाइट, Amazon, Flipkart, Myntra etc. वर उपलब्ध आहे.

boAt Wave Sigma 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

boAt Wave Sigma 3 मध्ये स्क्वेअर डायलसह मोठा 2.01-इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल. वॉचमध्ये मिळणाऱ्या विशेष तपशीलांबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टवॉचमध्ये एक DIY वॉच फेस स्टुडिओ आहे. यामध्ये IP67 रेटिंग आणि उजव्या बाजूला रोटेटिंग क्राऊन देखील आहे. boAt Wave Sigma 3 मध्ये MapmyIndia ची एक नेव्हिगेशन सिस्टम आहे, जी स्मार्टफोनवर अवलंबून न राहता अचूक टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन प्रदान करे. यात काही इनबिल्ट गेम्स आणि फाईन माय फोन, वेदर अपडेट यांसारखी सामान्य फीचर्स देखील आहेत. ही वॉच ब्लूटूथ कॉलिंगला देखील सपोर्ट करते.

आरोग्यविषयक फीचर्सदेखील यात देण्यात आले आहेत. boAt Wave Sigma 3 हार्ट-रेट मॉनिटर, SpO2 सेन्सरने सुसज्ज आहे. हे 700 हून अधिक स्पोर्ट्स मोडचे समर्थन करते. फिटनेस टार्गेट पूर्ण केल्यावर, वापरकर्त्यांना बॅज आणि boAt कॉईन सारखी बक्षिसे मिळतात. Wave Sigma 3 मध्ये म्युझिक आणि कॅमेरा नियंत्रित करण्यासाठी फीचर्स आहेत. बॅटरी बॅकअपच्या बाबतीत, वॉच एका चार्जवर 7 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :