अॅप्पल वॉच आजपासून भारतात सेलसाठी उपलब्ध

Updated on 06-Nov-2015
HIGHLIGHTS

अॅप्पल वॉच गोल्ड, रोज गोल्ड, स्पेस ग्रे, सिल्वर अॅल्युमिनियम, स्पेस ब्लक स्टेनलैस स्टील आणि १८ कॅरेट रोज गोल्ड आणि यला गोल्ड मध्ये उपलब्ध होईल. ग्राहक ह्याला अॅप्पलच्या रिटेल स्टोर्समधून खरेदी करु शकतो.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी अॅप्पलचे स्मार्ट वॉच आजपासून सेलसाठी उपलब्ध झाले आहे.  भारतात अॅप्पलच्या स्मार्टवॉचची किंमत ३०,९०० रुपये ठेवण्यात आली आहे.  ह्याआधी अॅप्पलने आपल्या स्मार्टवॉचला भारतात ६ नोव्हेंबरला लाँच करेल अशी माहिती आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिली होती.

 

अॅप्पल वॉच स्पोर्टच्या ३८एमएमची किंमत ३०,९०० रुपयांपासून सुरु होईल. तर त्याच्या ४२एमएमच्या स्मार्टवॉचची किंमत ३४,९०० रुपये आहे. ह्या दोघांच्या किंमती सर्व टॅक्स समाविष्ट करुन आहे. अमेरिकेमध्ये 38mm आणि 42mm मॉडेलची किंमत क्रमश: ३४९ डॉलर(२२,७०० रुपये) आणि ३९९ डॉलर(२५,९०० रुपये) इतकी आहे.

अॅप्पलचा सर्वात महागडे अॅप्पल वॉच भारतात १४.२ लाखात मिळेल. आजपासून उपलब्ध झालेल्या ह्या डिवाइसची किंमत अमेरिकेत १७,००० डॉलर(जवळपास ११ लाख रुपये) आहे. वॉचच्या ब्रँडचे सर्व रेंज भारतात सादर केले जातील, ज्याची किंमत ३,९०० पासून सुरु होईल. अॅप्पल वॉच (स्टेनलेस स्टील केज)ची भारतात किंमत ४८,९०० आणि ९५,९०० रुपये ह्या दरम्यान असेल.

अॅप्पल वॉच गोल्ड, रोज गोल्ड, स्पेस ग्रे, सिल्वर अॅल्युमिनियम, स्पेस ब्लॅक स्टेनलेस स्टील आणि १८ कॅरेट रोज गोल्ड आणि यला गोल्ड मध्ये उपलब्ध होईल. ग्राहक ह्याला अॅप्पलच्या रिटेल स्टोर्समधून खरेदी करु शकतो.

भारतात उपलब्ध अॅप्पल वॉचमध्ये वॉच ओएस 2 प्री-लोडेड असेल. त्याच्या अॅप स्टोरमध्ये सध्या १३०० अॅप्स उपलब्ध आहेत. IOS ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ह्या अॅप्पल वॉचला कोणत्याही ऑयफोनसह अगदी सहजपणे कनेक्ट करु शकता. अॅप्पल वॉचला सर्वात आधी एप्रिल महिन्यात अमेरिका, फ्रान्स, जपान आणि युनायटेड किंग्डममध्ये लाँच केले होते. त्यानंतर आता हळूृहळू हा इतर देशात सादर केला जातोय.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :