Westinghouseचा 32 इंचचा जबरदस्त TV फक्त 8 हजार रुपयांत लाँच, बघा फीचर्स

Westinghouseचा 32 इंचचा जबरदस्त TV फक्त 8 हजार रुपयांत लाँच, बघा फीचर्स
HIGHLIGHTS

Westinghouse कडून तीन नवीन टीव्ही सादर

टीव्हीची सुरुवातीची किंमत 7,999 रुपये

32 इंच, 43 इंच आणि 50 इंच लांबीचे टीव्ही उपलब्ध

Westinghouseने गेल्या वर्षी भारतात आपले स्मार्ट आणि नॉन-स्मार्ट टीव्ही लाँच केले. आता या युएस ब्रँडने आपल्या पोर्टफोलिओमध्ये तीन नवीन मॉडेल सादर केले आहेत. ज्यात 32-इंच लांबीचा नॉन-स्मार्ट टीव्ही, 43-इंच लांबीचा UHD आणि 50-इंच लांबीचा UHD स्मार्ट टीव्ही आहे. या टीव्हीची सुरुवातीची किंमत 7,999 रुपये आहे. हे तीन मॉडेल 13 जूनपासून एमेझॉनवर ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. या तिन्ही मॉडेल्सची किंमत किती असेल आणि त्यात कोणते फीचर्स असणार आहेत ते जाणून घेऊया…

32 इंच नॉन- स्मार्ट टीव्ही

32 इंच नॉन- स्मार्ट टीव्ही मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे. जो LED स्क्रीन, HD रिझोल्यूशन आणि 2 HDMI, 2 USB पोर्टसह येतो. मॉडेलमध्ये 20W च्या ऑडिओ आउटपुटसह 2 स्पीकर, डिजिटल नॉईज फिल्टर, ऑटोमॅटिक व्हॉल्यूम लेव्हल, ऑडिओ इक्वलायझर आहेत, जे MP3/WMA ऑडिओ फॉरमॅटला सपोर्ट करतील.

हे सुद्धा वाचा : नवीन स्मार्टवॉच हवी? Amazonवर मान्सून सेल सुरु, अगदी स्वस्तात खरेदी करा 'या' स्मार्टवॉच

43-इंच आणि 50-इंच स्मार्ट टीव्ही 

43-इंच UHD/4K मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे. तर 50-इंच UHD/4K टीव्हीची किंमत 27,999 रुपये आहे. जी 2GB RAM, 8GB ROM, 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्टला सपोर्ट करेल. बाजारातील उच्च श्रेणीतील टीव्हीच्या बरोबरीचे हे मॉडेल HDR10, Chromecast सह येतात. या दोन्ही मॉडेल्समध्ये 2 स्पीकर, एक डिजिटल नॉईज फिल्टर आणि 40-वॅट स्पीकर आउटपुट आहे, जे सराउंड साउंड टेकनॉलॉजीद्वारे समर्थित आहेत.

हे स्मार्ट टीव्ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे समर्थित आहेत, यामध्ये वापरकर्त्यांना Google Play Store द्वारे अनेक ऍप्स आणि गेममध्ये प्रवेश मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वापरकर्ते रिमोटच्या एका टचद्वारे Amazon Prime, YouTube आणि Sony Liv मध्ये प्रवेश करू शकतात.

ग्राहकांना 43-इंच आणि 50-इंच टीव्हीवर 500 निट्स ब्राइटनेस, बेझल-लेस डिझाइन, 4K रिझोल्यूशन, Google असिस्टंट, IPS सह एकप्रकारे उच्च ऑडिओ-व्हिज्युअल सिनेमाचा अनुभव मिळेल. दोन्ही टीव्हीमध्ये पॅनेल, ड्युअल-बँड WiFi, 6000+ एप्स आणि गेम्स उपलब्ध, अलॉय स्टँडसह आकर्षक डिझाइन आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo