Thomsonच्या नव्या Smart TVसह घरातंच येईल थिएटरची मज्जा! 50 इंच स्क्रीनची किंमत फक्त 16,999 रुपये

Updated on 26-May-2023
HIGHLIGHTS

Thomson FA सिरीज आणि Oath Pro Max 4K TV लाँच

30 मे पासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होतील.

Thomson FA सिरीजची सुरुवातीची किमंत 10,499 रुपये

Thomson ने भारतात अनेक नवीन स्मार्ट टीव्ही सादर केले आहेत, ज्यात FA सिरीज आणि Oath Pro Max 4K TV यांचा समावेश आहे.  नवीन स्मार्ट टीव्ही नवीन Thomson FA सिरीजमध्ये 32-इंच, 40-इंच आणि 50-इंच टीव्हीसह तीन टीव्ही मॉडेल समाविष्ट आहेत. चला तर मग जाणून घेऊयात TVची किमंत, फीचर्स आणि स्पेक्स – 

किमंत आणि उपलब्धता

Thomson FA सिरीजची किंमत 32 इंच मॉडेलसाठी 10,499 रुपये, 40 इंच मॉडेलसाठी 15,999 रुपये आणि 50 इंच मॉडेलसाठी 16,999 रुपये इतकी आहे. Oath Pro Max 4K टीव्ही 43-इंच आणि 50-इंच मॉडेल्ससाठी अनुक्रमे 22,999 रुपये आणि 27,999 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. लेटेस्ट TV कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सूचीबद्ध आहेत. 30 मे पासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होतील. 

नव्या Thomson TV चे फीचर्स

नवीन थॉमसन FA सिरीज टीव्हीमध्ये 1GB RAM आणि 8GB स्टोरेजसह RealTek प्रोसेसर आहे. या टीव्हीमध्ये बेझल-लेस डिस्प्ले देण्यात आले आहेत, जे फुल HD रिझोल्यूशनला सपोर्ट करतात. त्याबरोबरच, यात डॉल्बी डिजिटल सपोर्टसह 30W स्पीकर मिळत आहेत. यामध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime Video, Apple TV, ZEE5 इ. सह Google Play Store चा सपोर्ट मिळेल. 

 

https://twitter.com/ThomsonTvIndia/status/1661595159916855296?ref_src=twsrc%5Etfw

 

तर Oath Pro Max 4K TV 43-इंच आणि 50-इंच डिस्प्ले साईजमध्ये येतात. यात हजारो ऍप्स आणि गेमसाठी सपोर्ट मिळणार आहे. हे TV डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ साठी समर्थनासह बेझल-लेस डिझाइनसह येते. डॉल्बी ATMOS , डॉल्बी डिजिटल प्लस आणि डीटीएस ट्रू सराउंडसह 40W स्टीरिओ बॉक्स स्पीकर आहेत. नवीन थॉमसन 4K टीव्ही 2GB RAM आणि 16GB स्टोरेजसह क्वाड-कोर चिपसेटद्वारे समर्थित आहेत.  

 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :