Amazon Great Summer Sale 2024 best offers for 40 inch Smart TV
आजकाल प्रत्येक घरातील लोकांना आपल्या घरी मोठ्या आकाराचा स्मार्ट TV असावा, असे वाटते. कारण, आजकाल OTT ऍप्सची क्रेझ अधिक वाढत जात आहे. सिनेमा हॉलच्या तुलनेत लोक नेटफ्लिक्स, Amazon प्राइम, जिओ सिनेमा आणि हॉटस्टार सारख्या OTT ऍप्सवर चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्यास प्राधान्य देतात आणि मोठ्या आकाराच्या TV मुळे घरीचं थिएटरची मज्जा घेतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला नवीन स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. TCL फक्त 33,000 रुपयांमध्ये 65-इंच लांबीचा टीव्ही खरेदी करण्याची ऑफर देत आहे.
TCL च्या 65 इंच स्क्रीन साईजच्या स्मार्ट टीव्हीची किंमत फ्लिपकार्टवर 1,24,990 रुपये लिहलेली आहे. पण 60% डिस्काउंटनंतर TV 49,990 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. जर तुम्हाला जुना टीव्ही एक्सचेंज करायचा असेल, तर एक्सचेंज ऑफरद्वारे TVच्या खरेदीवर 16,990 रुपयांची सूट दिली जात आहे.
जर तुम्ही वरील ऑफरचा संपूर्ण लाभ मिळवण्यास यशस्वी झालात तर, टीव्हीची किंमत फक्त 33,000 रुपये होईल. त्याबरोबरच, 4,166 रुपयांच्या मासिक EMI ऑप्शनमध्ये टीव्ही खरेदी करता येईल. यावर दोन वर्षांची वॉरंटी आणि सात दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी दिली जात आहे.
TCL P635 हा अल्ट्रा HD 4K LED स्मार्ट टीव्ही आहे. टीव्हीमध्ये 24W साउंड आउटपुट आहे. हा टीव्ही 60 Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. हा एक गुगल स्मार्ट टीव्ही आहे, जो बेजललेस डिझाईनसह आहे. टीव्हीमध्ये डॉल्बी ATMOS सपोर्ट देण्यात आला आहे. त्याबरोबरच, यात Android TV सपोर्ट देखील आहे. महत्त्वाचे म्हणजे टीव्हीमध्ये Netflix, Prime Video आणि Disney+Hotstar सपोर्ट देण्यात आला आहे.