साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक दिग्गज Samsung ने भारतात त्यांची लेटेस्ट प्रीमियम TV रेंज लाँच केली आहे. कंपनीने नवीन Samsung Neo QLED 8K, OLED range, Frame TV लाँच केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या टीव्हीमध्ये कंपनीने 43 इंच ते 115 इंच लांबीपर्यंतचे स्क्रीन साईजमध्ये सादर केले आहेत. या टीव्हीमध्ये व्हिजन AI क्षमता जसे की, पिक्चर आणि साउंड एन्हांसमेंट, पर्सनलाइज्ड कंटेंट डिस्कव्हरी आणि मल्टी-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी सारखी फीचर्स आहेत. जाणून घेऊयात नव्या टीव्हीची किंमत-
Also Read: Amazon Great Summer Sale: 55 इंच जबरदस्त स्मार्ट टीव्ही झाले स्वस्त! किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी
Samsung कंपनीने Samsung Neo QLED 8K रेंज 2,72,990 रुपयांपासून सुरू होत आहे. त्याबरोबरच, सॅमसंग OLED रेंजची किंमत 1,54,990 रुपयांपासून सुरू होते. तर, Samsung Neo QLED 4K रेंजची किंमत 89,990 रुपयांपासून सुरू होते. Samsung Frame TV रेंजची सुरुवातीची किंमत 63,990 रुपये आहे. तर, अखेर Samsung QLED रेंजची सुरुवातीची किंमत 49,490 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीची प्री-बुकिंग आज 7 मे पासून सुरू झाली आहे. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना साउंडबार मोफत मिळतील.
Samsung Neo QLED 8K टीव्हीमध्ये 85 इंच, 75 इंच आणि 65 इंच स्क्रीन आकार आहे. Samsung Neo QLED 8K मध्ये इन्फिनिटी एअर डिझाइन आहे. या टीव्हीमध्ये स्लिम प्रोफाइल आणि बॉर्डर्स आहेत. तसेच, चांगल्या परफॉर्मन्ससाठी हे टीव्ही NQ8 AI Gen3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. AI एन्हांसमेंटसाठी यात 768 न्यूरल नेटवर्क सपोर्ट आहे.
त्याबरोबरच, ऑडिओसाठी यात 90W स्पीकर्स आहेत. यात डॉल्बी ATMOS आणि OTS प्रो सपोर्ट देखील आहे. Samsung 2025 QLED, OLED टीव्ही लाइनअप रेंजबद्दल बोलायचे झाल्यास, यात NQ4 AI Gen3 प्रोसेसर मिळेल.
Samsung Vision AI बद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्ट टीव्हीमध्ये 7 वर्षांपर्यंत OS अपग्रेड मिळतील. याशिवाय, टीव्हीमध्ये क्लाउड गेमिंग सेवा उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही पीसी आणि कन्सोलशिवाय टीव्हीवर AAA गेमचा आनंद घेऊ शकता. Samsung TV+ तुम्हाला 125 हून अधिक लाइव्ह चॅनेलचा ऍक्सेस देतो. ज्यामध्ये बातम्या, चित्रपट आणि मनोरंजन यांचा समावेश आहे. सॅमसंग एज्युकेशन हबद्वारे मुलांसाठी टीव्हीवर इंटरएक्टिव्ह लाइव्ह क्लासेस दिले जातात.