जबरदस्त AI फीचर्ससह Samsung ने लाँच केले 98 इंचपर्यंतचे मोठे Smart TV! किंमत ऐकून बसेल धक्का

Updated on 28-Mar-2025
HIGHLIGHTS

Samsung 2025 Neo QLED 8K TV सिरीज लाँच

सिरीजमध्ये 65 इंच ते 98 इंच स्क्रीन आकाराचे टीव्ही सादर करण्यात आले आहेत.

Samsung चे Smart TV भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.

साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक जायंट Samsung चे Smart TV भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. दरम्यान, कंपनीने जागतिक बाजारात आपले नवीन QLED टीव्ही सादर केले आहेत. हे टीव्ही 2025 च्या Neo QLED 8K टीव्ही सिरीजअंतर्गत लाँच केले गेले आहेत. यामध्ये QN990F आणि QN900F मॉडेल्सचा समावेश आहे. नवीन टीव्हीमध्ये सॅमसंग व्हिजन AI सिस्टम आहे, जी रिअल टाइममध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह पिक्चर आणि साउंडवर एकत्र कार्य करते.

Also Read: Refrigerator Deals: घरासाठी नवा फ्रिज हवाय? जास्त विज बिल येण्याची चिंता नाही, पहा सर्वोत्तम डील्स

विशेष म्हणजे TV मध्ये लाईव्ह ट्रान्सलेट सबटायटल्स, क्लिक टू सर्च, युनिव्हर्सल जेश्चर यांसारखी उपयुक्त AI फीचर्स देण्यात आली आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात नव्या Samsung स्मार्ट टीव्हीची किंमत-

Samsung 2025 Neo QLED 8K TV Series किंमत

QN990F सिरीजमध्ये 65 इंच ते 98 इंच स्क्रीन आकाराचे टीव्ही सादर केले आहेत. या फोनच्या 65 इंच लांबीच्या मॉडेलची किंमत $5499 म्हणेजच सुमारे 4,72,000 रुपये इतकी आहे. तर, टॉप 98-इंच मॉडेलची किंमत $9,999 म्हणजेच अंदाजे 8,58,000 रुपये इतकी आहे.

तर दुसरीकडे, QN900F सिरीजमध्ये 65 इंच ते 85 इंच स्क्रीन आकाराचे मॉडेल आहेत. या टीव्हीच्या 65 इंच लांबीच्या मॉडेलची किंमत $3299 म्हणजेच अंदाजे 2,83,000 रुपये आहे. तर, 85 इंच लांबीच्या मॉडेलची किंमत $5499 म्हणजेच अंदाजे 4,72,000 रुपये इतकी आहे.

Samsung 2025 Neo QLED 8K TV सिरीजचे तपशील

Samsung च्या QN990F मध्ये 8K AI अपस्केलिंग प्रो आहे आणि ते ग्लेअर-फ्री क्वांटम मॅट्रिक्स मिनी LED डिस्प्लेने सुसज्ज आहे. यामध्ये कंपनीने वन कनेक्ट बॉक्स दिला आहे. साउंडसाठी या टीव्हीमध्ये डॉल्बी ATMOS सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, ऑब्जेक्ट ट्रॅकिंग साउंड प्रो फीचर देखील त्यात देण्यात आले आहे, जे ऑडिओला स्क्रीनच्या हालचालीशी सुसंगत ठेवेल.

दुसरीकडे, QN900F मॉडेल्स 65 इंच ते 85 इंचपर्यंत स्क्रीन साईजमध्ये येतात. या टीव्हीमध्ये 8K AI अपस्केलिंग फीचर आहे. हा TV मेटल फ्रेम डिझाइनमध्ये येतो, जो 165Hz मोशन अ‍ॅक्सिलरेटरसह आहे. त्याबरोबरच, ऑडिओ आणि साउंडसाठी, टीव्ही ऑब्जेक्ट ट्रॅकिंग साउंड प्लस आणि डॉल्बी ATMOS ला सपोर्ट करतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :