JioTele os
JioTele OS: आज 18-2-2025 रोजी मंगळवारी Smart TV साठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम म्हणून JioTele OS चे अनावरण करण्यात आले. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवे स्मार्ट टीव्ही ऑपरेटिंग सिस्टिम JioTele OS आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) द्वारे समर्थित कंटेंट शिफारसी देईल. हे स्मार्ट टीव्ही OS लोकप्रिय OTT ऍप्सना समर्थन देईल. ते प्लॅटफॉर्मवर जागतिक आणि प्रादेशिक कंटेंट इंटिग्रेशन ऑफर करेल, असे Jio ने सांगितले आहे.
या सिस्टमला नियमित सॉफ्टवेअर अपडेट्स देखील मिळतील. जेणेकरून नवीन ऍप्स आणि कंटेंट फॉरमॅटसाठी सपोर्ट जोडता येईल. या अपडेट्समध्ये नवीन OS वर चालणाऱ्या स्मार्ट टीव्हीचे सिक्योरिटी पॅचेस देखील समाविष्ट असण्याची अपेक्षा आहे. मात्र, JioTele OS हे Google च्या Android TV ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे की नाही? हे टेलिकॉम ऑपरेटरने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
टेलिकॉम दिग्गज Jio ने दिलेल्या माहितीनुसार, नव्याने सादर केलेले जिओटेल ओएस टीव्ही चॅनेल तसेच लोकप्रिय OTT ऍप्सच्या समर्थनासाठी डिझाइन केलेले आहे. एवढेच नाही तर, जिओटेल OS वर चालणाऱ्या स्मार्ट टीव्हीवर क्लाउड-आधारित गेम देखील सपोर्ट करतील, असे Jio ने सांगितले आहे. वापरकर्ते एकाच रिमोटने या सर्व फीचर्सवर सहज नियंत्रण ठेवू शकतील.
याव्यतिरिक्त, JioTele OS वरील कंटेंटसाठी AI-पॉवर्ड रिकमेंडेशन देखील ऍक्सेस करू शकतात. परंतु, कंपनीने याबद्दल अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. नवीन JioTele OS सह स्मार्ट टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर प्रादेशिक आणि जागतिक कंटेंटचे अखंड एकत्रीकरण करण्याची क्षमता Jio ने दाखवली आहे. एवढेच नाही तर, या प्लॅटफॉर्मवर समर्थित स्मार्ट टीव्हीवर लॅग-फ्री 4K परफॉर्मन्सची सुविधा देण्याचा दावाही केला जात आहे.
JioTele OS असलेले स्मार्ट टीव्ही येत्या 21 फेब्रुवारीपासून खरेदीसाठी उपलब्ध असतील. ग्राहक BPL, JVC, Kodak आणि Thomson सारख्या कंपन्यांकडून निवडक मॉडेल्स खरेदी करण्यास सक्षम असतील. येत्या काही महिन्यांत यासह अधिक मॉडेल्स उपलब्ध होतील, असे देखील Jio ने सांगितले आहे.